शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आंब्याचे झाड न कापता बांधले चार मजली सुंदर घर! पाहा फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 3:29 PM

1 / 12
आपण अनेकदा पाहिले आहे की लोक स्वतःचे घर (House) बांधण्यासाठी झाडे (Tree) तोडतात. त्यामुळे पृथ्वीवरून जंगले हळूहळू नष्ट होत आहेत. पण आज आम्ही तुम्हाला जे घर दाखवणार आहोत, ते पाहून तुम्ही घर बांधणाऱ्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.
2 / 12
या व्यक्तीने आब्यांचे झाडे न कापता सुंदर 4 मजली घर (4 storey Mango House) बांधले आहे. आयआयटीच्या इंजिनिअर असलेल्या कुल प्रदीप सिंह यांनी 2000 साली असे घर बांधले होते, ज्याची सध्या जगभरात चर्चा होत आहे.
3 / 12
तलावांचे शहर असलेल्या उदयपूरमध्ये त्यांनी चार मजली घर बांधले. विशेष म्हणजे त्यांनी हे घर 80 वर्षे जुन्या आंब्याच्या झाडाला न कापता त्यावरच बांधले आहे. या घराला 'ट्री हाऊस' असेही म्हणतात.
4 / 12
जंगलात राहणारे लोक जसे बनवतात, तसे ते लाकडापासून बनवलेले घर असेल, असे तुम्हाला वाटत असेल. तर हे एक 'फुल फर्निश्ड' घर आहे. ज्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. पर्यावरणाची आवड असणाऱ्या कुल प्रदीप सिंह यांनी हे घर बांधण्यासाठी झाडाची एकही फांदी तोडली नाही.
5 / 12
कुल प्रदीप सिंह यांनी त्यांच्या स्वप्नातील घराची रचना झाडाच्या फांद्यांनुसार केली आहे. त्यांनी घरातील सोफा स्टँड आणि टीव्ही स्टँड म्हणून झाडाची डहाळी वापरली. या घरात किचन, बेडरूम, बाथरूम, डायनिंग हॉल आणि लायब्ररी यासह सर्व सुविधा आहेत.
6 / 12
किचन, लायब्ररी, बेडरुम इत्यादीमधून झाडांच्या फांद्या बाहेर आल्याचे फोटोंमधून दिसून येत आहे. त्यामुळे झाडाला फळे आली की, ती घराच्या आत लटकतात. घरात अनेक खिडक्या बसवण्यात आल्या आहेत, त्यामुळे अनेक पक्षी घरात येत राहतात.
7 / 12
कुल प्रदीप सिंह यांच्या स्वप्नातील हे घर जमिनीपासून 9 फूट उंचीवर बांधले आहे. त्याची उंची सुमारे 40 फूट आहे. या घरात बनवलेल्या पायऱ्याही खूप खास आहेत.
8 / 12
विशेष म्हणजे, हे 4 मजली घर बनवण्यासाठी कुठेही सिमेंटचा वापर करण्यात आलेला नाही. ते तयार करण्यासाठी स्टील, सेल्युलर आणि फायबर शीटचा वापर करण्यात आला आहे. जोराचा वारा सुटला की हे घर डोलायला लागते.
9 / 12
विशेष म्हणजे, हे 4 मजली घर बनवण्यासाठी कुठेही सिमेंटचा वापर करण्यात आलेला नाही. ते तयार करण्यासाठी स्टील, सेल्युलर आणि फायबर शीटचा वापर करण्यात आला आहे. जोराचा वारा सुटला की हे घर डोलायला लागते.
10 / 12
विशेष म्हणजे, हे 4 मजली घर बनवण्यासाठी कुठेही सिमेंटचा वापर करण्यात आलेला नाही. ते तयार करण्यासाठी स्टील, सेल्युलर आणि फायबर शीटचा वापर करण्यात आला आहे. जोराचा वारा सुटला की हे घर डोलायला लागते.
11 / 12
विशेष म्हणजे, हे 4 मजली घर बनवण्यासाठी कुठेही सिमेंटचा वापर करण्यात आलेला नाही. ते तयार करण्यासाठी स्टील, सेल्युलर आणि फायबर शीटचा वापर करण्यात आला आहे. जोराचा वारा सुटला की हे घर डोलायला लागते.
12 / 12
सर्व फोटो - सोशल मीडिया
टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनJara hatkeजरा हटके