French queen Marie Antoinette executed for illicit relation with son
'या' राणीवर लावले होते मुलाच्या लैंगिक शोषणाचे आरोप, भर चौकात सर्वांसमोर शीर धडापासून केलं होतं वेगळं! By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 3:40 PM1 / 8फ्रान्समध्ये 19व्या शतकाच्या सुरूवातीला एक अशी राणी झाली होऊन गेली जिच्यावर फारच विचित्र आणि घाणेरडे आरोप लावण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाकडून तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ती राणी होती मेरी एंटोनेट. या राणीचं लग्न फ्रान्सचा राजा लुई सोळाव्यासोबत झालं होतं.2 / 8मेरी आजही जगातल्या सर्वात रहस्यमय राण्यांपैकी एक मानली जाते. काही इतिहासकार तिला फार चांगलं सांगतात तर काही तिच्याबाबत वाईट सांगतात. 3 / 8पण काही दिवसांपूर्वी हे आढळून आलं की, तिला देण्यात आलेला मृत्यूदंड हा चुकीचाच होता. तिच्यावर लावण्यात आलेले जास्तीत जास्त आरोप हे षडयंत्राचा भाग होते.4 / 8राजा लुई 18वा फ्रान्सच्या गादीवर बसला. तेव्हा राजाने मोठा भाऊ लुई आणि मेरी एंटोनेटची कबर खोदून त्यांचे पार्थिव फ्रान्सच्या राजघराण्यातील इतर लोकांसोबत पुन्हा गाडण्याचे आदेश दिले होते.5 / 8मात्र, नंतर हे स्पष्ट झालं होतं की, लुईसवर यासाठी दबाव टाकण्यात आला होता. म्हणून त्याने खोटं सांगितलं होतं. त्यानंतर कोर्टाने राणीला दोषी ठरवलं आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.6 / 8मेरीचं जीवन इतकं शाही होतं की, बालपणी तिच्यासाठी एक परीकथेसारखं संपूर्ण शहरच वसवण्यात आलं होतं. राणी म्हणून ती लोकांच्या लाडकी होती. मेरी जेव्हा किशोरावस्थेत आली तेव्हा फ्रान्समधील तरूणींची तिची फॅशन अनेक वर्ष फॉलो केली. 7 / 8जेव्हा किशोरावस्थेत आल्यावर मेरी पहिल्यांदा फ्रान्सची राजधानी पॅरिसला आली तेव्हा तिला पाहण्यासाठी 50 हजारांपेक्षा जास्त लोक जमले होते. असे सांगितले जाते की, यादरम्यान गर्दीत गोंधळ झाला होता. चेंगराचेंगरी होऊन यात 30 लोकांचा जीवही गेला होता. (Image Credit : Wikipedia)8 / 8अमेरिकन स्वातंत्र्यता संग्राम सेनानींनी 1788 मध्ये जेव्हा त्यांचं पहिलं घर मुस्किंगम आणि ओहियो नदीच्या किनारी तयार केलं तेव्हा त्यांनी फ्रान्सच्या मदतीची एक परतफेड केली. त्यांनी त्यांच्या या नव्या समुदायाचं नाव म्हणजे नव्या शहराचं नाव मेरिएट्टा ओहियो असं ठेवलं. हे नाव फ्रान्सची महाराणी मेरी एंटोनेटच्या सन्मानार्थ ठेवण्यात आलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications