शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

थेट गुरुत्वाकर्षणालाच आव्हान देणारा अवलिया; छोट्या-मोठ्या वस्तूंचा सावरतो लिलया तोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 2:02 PM

1 / 7
गाझापट्टी स्फोटके, हल्ल्यांसाठी आणि गरीबीसाठी ओळखली जाते. मात्र, याच जमिनीवर एक अवलियाने वस्तू एकमेकांवर ठेवून त्यांचा तोल सावरण्याची अजब किमया करून दाखविली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोठ्या वस्तूवर लहान वस्तू ठेवून नाही तर छोट्या वस्तूवर मोठी वस्तू अधांतरी ठेवून तिचा तोल सावरून दाखविला आहे.
2 / 7
मोहम्मद अल शेनबारी या तरुणाने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणालाच आव्हान दिले आहे. चित्रपटांमध्ये मोठ्या उंचीवरील दोरीवर तलवारबाजी, कुंग फू सारखी फायटिंग करताना नायकाने तोल सावरल्याची चित्रे तुम्ही पाहिली असतील. तसाच काहीसा प्रकार मोहम्मदने लिलया साधला आहे.
3 / 7
24 वर्षीय मोहम्मदने खुर्चीला एका पायावर उभे केले आहे.
4 / 7
एवढेच नाही गॅसने भरलेल्या दोन सिलिंडरना एका छोट्या पाईपवर वाकडे तिकडे उभे करून दाखवले आहे.
5 / 7
एका मोठ्या जुन्या टीव्हीला कोकच्या बाटलीवर ठेवण्याची किमया साधली आहे.
6 / 7
यावर मोहम्मद याने सांगितले की, मी जेव्हा वस्तूंचा तोल सांभाळायला जातो तेव्हा जे वाटते ते शब्दांत सांगू शकत नाही. असे वाटते की मला चुंबकीय शक्ती मिळाली आहे, यामुळे ही शक्ती या वस्तूंमध्ये प्रवाहित होत असेल.
7 / 7
यावर मोहम्मद याने सांगितले की, मी जेव्हा वस्तूंचा तोल सांभाळायला जातो तेव्हा जे वाटते ते शब्दांत सांगू शकत नाही. असे वाटते की मला चुंबकीय शक्ती मिळाली आहे, यामुळे ही शक्ती या वस्तूंमध्ये प्रवाहित होत असेल.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके