शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऐकावं ते नवलंच! 'या' तरुणीला करायचंय विमानासोबत लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 3:41 PM

1 / 8
लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. लग्नाबाबत काहींनी खूप स्वप्न ही रंगवलेली असतात. मात्र तुम्हाला कोणी विमानासोबत लग्न करायचं आहे असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे.
2 / 8
जर्मनीतील एका तरुणीला आपलं आयुष्य विमानासोबत व्यतीत करायचे आहे. मिशेल कोबके असं तरुणीचं नाव आहे.
3 / 8
मिशेल गेल्या 5 वर्षांपासून बोइंग 737-800 विमानासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
4 / 8
मिशेलने या विमानाचे निकनेम Schatz म्हणजे डार्लिंग ठेवलं आहे. तसेच रिलेशनशिप अत्यंत रोमँटीक असल्याचं देखील तिने म्हटलं आहे.
5 / 8
2013 मध्ये मिशेल पहिल्यांदा बोइंग 737-800 विमानात बसली होती. त्यावेळी तिला विमानाचे आकर्षण वाटू लागले आणि 2014 मध्ये ती विमानाच्या प्रेमात पडली.
6 / 8
मिशेल विमानासोबत रिलेशनशिपमध्ये असून लवकरच त्याच्यासोबत लग्न करण्याची तिची इच्छा आहे.
7 / 8
मिशेलने या विमानाचे एक छोटे मॉडेल तयार केले आहे. ज्याच्यासोबत ती तिचा वेळ घालवते. तसेच आमचं रिलेशन नॉर्मल असल्याचं तिने सांगितलं आहे.
8 / 8
मिशेलच्या कुटुंबीयांचा तिचा रिलेशनशिपवर काही आक्षेप नाही. मात्र समाजातील अनेक लोक हे रिलेशनशिप स्वीकारत नाहीत. त्यांना ही बाब चुकीची वाटते. मात्र लवकरच ते ही ही गोष्ट स्वीकारतील असं मिशेलने म्हटलं आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्न