शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' कारणाने जायन्ट व्हायरसचा वाढू शकतो धोका, जाणून घ्या कसे असतात अन् कुठून येतात 'हे' व्हायरस!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 11:12 AM

1 / 10
ग्लोबल वार्मिंगमुळे वेगाने ग्लेशिअर म्हणजे वर्षानुवर्षे गोठलेला बर्फ वितळत आहे. पण कधी तुम्ही याचा विचार केलाय का की, या बर्फात कशाप्रकारचे विषाणू असू शकतात? एक असा अंदाज आहे की, अनेक वर्षांपासून गोठलेल्या या बर्फात अनेक जीवघेणे व्हायरस दबलेले आहेत. 'द नेचर जर्नल'च्या एका रिपोर्टनुसार, या व्हायरसबाबत हे ठामपणे सांगता येणार नाही की, ते नष्ट झाले असतील. असंही होऊ शकतं की, ते अनेक वर्षांपासून निष्क्रिय झाले असतील आणि बर्फ वितळल्यावर जिवंत होतील.
2 / 10
जरा विचार करा की, काय होईल जेव्हा आपल्याला हजारो वर्षांपासून खोल जमिनीत गोठलेल्या व्हायरससोबत लढावं लागेल, ज्यात आपल्यापेक्षा जास्त जीन्स असतील? खरंतर अशा स्थितीकडे आपण स्वत:च आपल्या ढकलत आहोत. जर ग्लोबल वार्मिंग अशाप्रकारेच वाढत गेलं तर लवकरच आपल्याला अशा स्थितीचा सामना करावा लागू शकतो.
3 / 10
कोरोनातून आपणं शिकलं पाहिजे.... - सध्याच्या काळात लाखो लोक कोरोना व्हायरसने ग्रस्त होत आहेत. हा व्हायरस वटवाघुळासारख्या प्राण्यातून मनुष्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याचं कारणही वटवाघुळाचं सूप पिणं मानलं जात आहे. पण याबाबत सध्याच ठामपणे काही सांगता येणार नाही. पण हे नक्की की, सार्स कोरोना व्हायरस-2 वटवाघुळात फार पूर्वीपासून दिसून येतो.
4 / 10
यांना जायन्ट व्हायरस का म्हटलं जातं? - आता तुमच्या मनात हा प्रश्न येणं सहाजिक आहे की, यांना जायन्ट व्हायरस का म्हटलं जातं आणि इतर व्हायरसपेक्षा हे वेगळे का असतात? मुळात हे आपल्या सर्वांनाच माहीत असतं की, जास्तीत जास्त व्हायरसचा आकार हा फार लहान असतो आणि यांच्यात मोजकेच जीन्स असतात. मात्र, जायन्ट व्हायरसबाबत असा अंदाज आहे की, काही जायन्ट व्हायरस हे बॅक्टेरिया इतके मोठे असू शकतात. पण व्हायरस असो वा बॅक्टेरिया ते बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची गरज लागणारच आहे.
5 / 10
व्हायरस आणि बॅक्टेरियाची साइज - बॅक्टेरियाचा आकार इतका लहान असतो की, ते आपण मायक्रोस्कोपच्या मदतीशिवाय बघू शकत नाही. पण सामान्यपणे व्हायरसचा आकार बॅक्टेरियापेक्षाही हजार पटीने छोटा असतो. तर जायन्ट व्हायरस बॅक्टेरिया इतके मोठे असू शकतात. यात जेनेटिक मटेरिअल सुद्धा 100 ते हजार जीन्सचं असू शकतं.
6 / 10
सायबेरियात रिसर्च - 2014 मध्ये सायबेरियात झालेल्या एका रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच जायन्ट व्हायरस पाहिला. त्यानंतर एकाच वर्षात म्हणजे 2015 मध्ये सायबेरियात आणखी एक जायन्ट व्हायरस आढळून आला. या दोन्ही व्हायरसमध्ये 500 पेक्षा जास्त जीन्स होते. दुसरीकडे आतापर्यंतचा सर्वात घातक मानल्या जाणाऱ्या HIV व्हायरसमध्ये केवळ 9 जीन्स असतात.
7 / 10
कुठे आढळले जायन्ट जीन्स? - वैज्ञानिकांना हे जायन्ट व्हायरस हजार फूट खोलात तीस हजार वर्ष जुन्या ग्लेशिअरमध्ये सापडले. जेव्हा वैज्ञानिकांनी या व्हायरसना अमीबाने एक्सपोज केलं तेव्हा या व्हायरसने अमीबाला इन्फेक्ट केलं. त्यावरून वैज्ञानिकांना हे कळालं की, हे व्हायरस अजूनही जिवंत आहेत.
8 / 10
जीवाला धोका? - जायन्ट व्हायरसबाबत चिंतेची बाब ही आहे की, हे व्हायरस केवळ जेनेटिकलीच जास्त मोठे असतात असं नाही तर ते वातावरणात जास्त काळासाठी जिवंत राहू शकतात. हेच कारण आहे की, हे व्हायरस ह्यूमन लाइफमध्ये आले तर धोका वाढू शकतो.
9 / 10
ग्लेशिअर वितळण्याची कारणे - केवळ ग्लोबल वार्मिंगच नाही तर मायनिंग म्हणजे खदान खोदणे आणि ऑइल ड्रिलिंग म्हणजे जमिनीतून तेल काढणे यानेही ग्लेशिअर वेगाने वितळत आहेत. त्या कारणाने वितळत्या बर्फातून आपल्या जगात जायन्ट व्हायरस येण्याची शक्यता वाढत आहे.
10 / 10
आतापर्यंतचा सर्वात मोठा व्हायरस - वैज्ञानिकांना वितळत्या ग्लेशिअरमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा जे व्हायरस सापडला आहे त्याचं नाव आहे मिमी व्हायरस. मिमीच्या आत 1200 जीन्स आढळून आले आहेत. हा व्हायरस इतर बॅक्टेरियापेक्षा आकाराने फार मोठा आहे.
टॅग्स :scienceविज्ञानInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स