Gift ideas for makar sankrant haldikunku
हळदीकुंकवाच्या वाणासाठी 'हे' आहेत काही हटके पर्याय! By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 7:05 PM1 / 13नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे, मकर संक्रांती. या दिवशी मनातील सर्व राग रूसवे दूर करून सर्वांशी प्रेमान बोलून तिळगुळाने सर्वांच तोंड गोड करतात. त्यानंतर मकर संक्रातीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकवांना सुरूवात होते. सौभाग्याचे लेणं हळद-कुंकू असून कुटुंबप्रमुख असलेल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याला सुदृढ, निरोगी स्वास्थ्य मिळावं म्हणून महिलावर्ग हळद-कुंकू देऊन शुभेच्छा देतात. या हळदीकुंकवाला स्त्रीया अनेक वेगवेगळ्या वस्तू वाण म्हणून देतात. अशातच तुम्हीही हळदीकुंकवासाठी वाण म्हणून काय द्यावं या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला काही हटके ऑप्शन्स देणार आहोत. जाणून घेऊया हळदीकुंकवासाठी वाण म्हणून देण्यात येणाऱ्या काही वस्तूंबाबत...2 / 13तुळशीचं रोपटं - वृक्ष संवर्धानाचा संदेश देण्यासाठी सर्वात हटके पर्याय म्हणजे तुळशीचं रोप. तुळशीचे अनेक आरोग्यवर्धक फायदेही आहेत. त्यामुळे तुम्ही हळदीकुंकवाचं वाण म्हणून तुळशीचं रोप देऊ शकता. 3 / 13कापडांच्या पिशव्या - सध्या राज्यभरात प्लॅस्टिक बंदी असल्यामुळे तुम्ही कापडाच्या पिशव्या वाण म्हणून देवू शकता. 4 / 13नव्या वर्षाचे पॉकेट कॅलेंडर - नव्या वर्षाला सुरुवात झाली असून अनेकदा काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी किंवा पाहण्यासाठी कॅलेंडरची गरज असते. त्यामुळे तुम्ही एखादं पॉकेट कॅलेंडरही देऊ शकता. 5 / 13फ्रिज बॅग्स - अनेकदा बाजारांमधून आणलेल्या भाज्या किंवा फळं फ्रिजमध्ये ठेवताना प्लॅस्टिक बॅग्जचा वापर करण्यात येतो. परंतु प्लॅस्टिक बंदीमुळे बाजारात त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. अशावेळी तुम्ही फ्रीज बॅग्सचा वापर करू शकता. 6 / 13रेसिपी बुक - अनेकदा लोकांच्या हृदयापर्यंत पोहचण्याचा मार्ग पोटातून जातो. म्हणजेच लोकांना जेवढं चविष्ट पदार्थ खावू घालणार तेवढं तुम्ही त्यांच्या हृदयात महत्त्वाचं स्थान मिळवाल असं आपण नेहमी ऐकतो. त्यासाठी तुम्ही एखादं छानसं रेसिपी बुक वाण म्हणून देवू शकता. 7 / 13हर्बल सीड्स - अनेकदा घरामध्ये काही हर्बल सीड्स ठेवले जातात. ज्यामुळे काही आरोग्याच्या समस्यांवर घरगुती उपचार करणं शक्य होतं. त्यासाठी तुम्ही वाण म्हणून हर्बल सीड्स घेऊ शकता. 8 / 13साडी प्रिंट बटवा - महिलांच्या वॉर्डरोबमध्ये अनेक फॅन्सी वस्तूंचा समावेश असतो. तुम्हीही हळदीकुंकवासाठी वाण म्हणून एखादा साडी प्रिंट असलेला बटवा देऊ शकता. 9 / 13मॉयश्चरायझर - सध्या हिवाळा सुरू असून मॉयश्चरायझरचं छोटसं पॅकेट तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. 10 / 13सॅनिटायझर - सध्या प्रदुषणामुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. अशातच आपले हात स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही सॅनिटायझरचा वापर करू शकता. 11 / 13ग्रीन टी - सध्या सर्वांना उद्भवणारी समस्या म्हणजे लठ्ठपणाची. ग्रीन टी यापासून सुटका करण्यासाठी मदत करतो. त्याचप्रमाणे हे हल्दी असल्यामुळे फायदेशीर ठरतं. 12 / 13टिश्यू पेपर - घरामध्येही रोजच्या वापरात टिश्यू पेपर अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुम्ही हळदीकुंकवासाठी वाण म्हणून टिश्यू पेपर देऊ शकता. 13 / 13साडी कव्हर - महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे साडी. अनेकदा ठेवणीतल्या आणि महागड्या साड्या अशाच कपाटात ठेवल्या जातात. त्यापेक्षा त्या साडी कव्हरमध्ये ठेवल्याने फायदा होतो. साडीही व्यवस्थित राहते. वाण म्हणून देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications