Gloomy Sunday is the saddest song in the world, many committed suicide after listening it
'हे' आहे जगातील सर्वात दुःखी गाणे, ऐकून अनेकांनी केल्या आत्महत्या; सरकारने घातली होती बंदी... By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 4:22 PM1 / 6 प्रेमात पडलेल्या व्यक्तीला नेहमी रोमँटिक गाणी ऐकायला आवडतात. प्रेमात पडलेला पुरुष किंवा स्त्री सतत प्रेमाची गाणी ऐकताना दिसतात, तर प्रेमात धोका मिळाले किंवा हृदय तुटलेले व्यक्ती दुःखी गाणी ऐकताना दिसतात. अशी अनेक गाणी आहेत, जी पुन्हा-पुन्हा ऐकावीशी वाटतात. पण, काही गाणी अशी असतात, जी ऐकून माणूस अचानक दुःखी होतो. गाणी ऐकून काहीजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलतात. अशाच प्रकारची घटना काही दशकांपूर्वी घडली होती.2 / 6 आज आम्ही तुम्हाला अशा एका गाण्याबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून लोक आत्महत्या करत होते. त्या गाण्याला 'द हंगेरियन सुसाईड सॉन्ग' असं म्हटलं जातं. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या गाण्याची इतकी भीती होती की, ते ऐकण्यावरही त्या काळात बंदी घालण्यात आली होती. ही बंदी एक-दोन नव्हे तर तब्बल 62 वर्षे कायम राहिली.3 / 6 'ग्लूमी संडे' या नावाने तयार करण्यात आलेले गाणे हंगेरियन संगीतकार रेझो सेरेस यांनी संगीतबद्ध केले होते. रेसो यांनी 1933 मध्ये 'ग्लूमी संडे' किंवा 'सॅड संडे' या नावाने हे गाणे तयार केले. प्रेमाची जोड देऊन त्यांनी हे गाणे बनवले. पण या गाण्याने इतकं दुःख दिलं होतं की, ऐकणारा स्वतःहून रडायचा आणि आत्महत्येसारखं पाऊल उचलायचा.4 / 6 या गाण्यात एवढी वेदना होती की, ते ऐकून अनेकांनी आत्महत्या केल्या. ग्लूमी संडे हे गाणे ऐकल्यानंतर बर्लिनमध्ये आत्महत्या केल्याची पहिली घटना समोर आली. येथे एक मुलगा गाणे ऐकून इतका दुःखी झाला की त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्याचवेळी न्यूयॉर्कमध्ये एका वृद्धाने गाणे ऐकून सातव्या मजल्यावरून उडी मारली. याशिवाय हंगेरीमध्ये एका 17 वर्षीय तरुणीने गाणे ऐकून पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली.5 / 6 हे गाणे ऐकल्यानंतर आत्महत्येच्या घटना सातत्याने कानावर पडू लागल्या. यानंतर या गाण्यावर 62 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. हे गाणे ऐकल्यानंतरही कोणी आत्महत्या करू नये, म्हणून पुन्हा संगीतब्ध करण्यात आले. पण त्यानंतरही आत्महत्येचा सत्र सुरुच राहिले. अखेर 1941 मध्ये या गाण्यावर बंदी घालण्यात आली. 2003 मध्ये या गाण्यावरील बंदी उठवण्यात आली. हे गाणे आजही यूट्यूबवर आहे. पण आज हे गाणे ऐकल्यानंतर लोकांना समजत नाही की, त्यात काय होतं की ते ऐकून लोक आत्महत्या करायचे.6 / 6हे गाणे लिहिणाऱ्या रेझो सेरेसची एक मैत्रीण होती. तो त्याच्या मैत्रिणीवर खूप प्रेम करायचा. त्या काळात तो आपले नाव बनवण्यासाठी धडपडत होता, पण त्याला यश मिळत नव्हते. तो एक चांगला पियानोवादक होता आणि त्याच क्षेत्रात आपले करिअर घडवायचे होते. मात्र, यश मिळत नव्हते. यानंतर त्याच्या मैत्रिणीने त्याची फसवणूक केली. प्रेमात मिळालेल्या फसवणुकीने सेरेस मोडला होता. एके दिवशी सेरेसने आपल्या मैत्रिणीच्या आठवणीत एक गाणे लिहिले. जे हळूहळू इतके लोकप्रिय झाले की प्रेमात तुटलेल्या लोकांचे ते आवडते गाणे बनले होते. यासोबतच गाणे ऐकून आत्महत्येचे सत्रही सुरू झाले. आणखी वाचा Subscribe to Notifications