शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' रहस्यमय डोंगरात दडला आहे सोन्याचा मोठा खजिना, पण जे जातात ते येत परत येतच नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 1:15 PM

1 / 10
जगभरात अनेक रहस्य आहेत ज्यांचा उलगडा आजपर्यंत कुणी करू शकलं नाही. ही रहस्ये उलगडण्याचा अनेक वैज्ञानिक आणि शोधकर्त्यांनी प्रयत्न केला. पण त्यांनाही यात यश आलं नाही.
2 / 10
आज आम्ही तुम्हाला एका अशाच रहस्यमय जागेबाबत सांगणार आहोत जी अमेरिकेत आहे. येथील द लास्ट डचमॅन गोल्ड माइनमध्ये सोन्याची खाण आहे. पण जे कुणी इथे गेले तर परत कधी आले नाही. या रहस्याबाबत आजही समजू शकलेलं नाही.
3 / 10
अमेरिकेतील एरिझोनाच्या सुपरस्टीशन डोंगरावर रहस्यमय सोन्याचा खजिना आहे. असं सांगितलं जातं की, अनेक लोक इथे सोन्याच्या शोधात गेले. लोक इथे भटकत होते आणि खजिना मिळाला नाही. पण हे लोक परतही आले नाहीत.
4 / 10
या भागात व्यक्तीला भाजवणारी गरमी आणि गोठवणारी थंडी असते. इथे येणारे लोक वाचू शकत नाहीत. पण सोन्याच्या शोधात इथे लोकांचं येणं सुरूच होतं. त्यामुळे प्रशासनाने इथे जाण्यावर बंदी घातली.
5 / 10
एरिझोनाच्या सुपरस्टीशन डोंगरांमध्ये खाणीत खोदकाम करणं बेकायदेशीर आहे. सोनं सापडलं तरी ते सरकारी खजिन्यात जमा करावं लागतं. पण तरीही लोक सोनं शोधण्यासाठी इथे जातात आणि आपला जीव गमावून बसतात.
6 / 10
रिपोर्टनुसार, अनेक लोक सोनं शोधण्यासाठी गेले, पण पुन्हा परत आले नाहीत. असंही सांगितलं जातं की, सोनं शोधण्यासाठी गेलेल्या लोकांचे मृतदेह नंतर पोलिसांना सापडले.
7 / 10
एरिझोनाच्या खतरनाक डोंगरामध्ये एकदा हरवल्यानंतर जिवंत परत येणं अवघड आहे. त्याशिवाय डोंगरात भीषण उष्णता आणि हिवाळ्यात गोठवणारी थंडी असते.
8 / 10
येथील गरमी आणि थंडी सहन करणं लोकांसाठी सोपं नाही. अशात या डोंगरात कुणी बेपत्ता झालं तर त्यांचं वाचणं अवघड आहे.
9 / 10
सोन्याच्या शोधात डोंगरांवर जाणाऱ्या लोकांच्या मृत्यूमुळे प्रशासनाने इथे लोकांच्या येण्यावर बंदी घातली आहे. सोनं शोधण्याच्या नादात आलेल्या अनेक लोकांची इथे जीव गेला आहे.
10 / 10
त्यामुळे येथील खाणीत खोदकाम बेकायदेशीर केलं आहे. काही लोकांना इथे सोन्याचे तुकडे सापडले. पण खाणीचा काही पत्ता लागला नाही.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स