Golu 2 Buffalo Eating Dry Fruits Price 10 Crores, Earning 25 lakhs to the owner every year
ड्रायफ्रूट खाणारा 'गोलू २' रेडा; दरवर्षी मालकाला करून देतो २५ लाखांची कमाई By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 2:17 PM1 / 10बिहारची राजधानी पटना इथं वेटनरी कॉलेजच्या मैदानावर सध्या मुर्रा जातीचा रेडा गोलू २ पाहायला लोकांची गर्दी होतेय. हरियाणातील शेतकरी किसान नरेंद्र सिंह हे मंगळवारी गोलू २ ला घेऊन पटनाला पोहचले. २३ डिसेंबरपर्यंत गोलू २ सोबत ते पटनाला राहणार आहेत.2 / 10पद्मश्री सन्मानित नरेंद्र सिंह त्यांच्या रेड्याला गोलू बोलतात. त्याची किंमत जवळपास १० कोटी इतकी आहे. ६ वर्षाच्या गोलू २ ची त्यांच्या घरात तिसरी पिढी आहे. त्याचा आजोबा गोलू, मुलगा गोलू १ आणि हा गोलू २. 3 / 10गोलू २ चे सीमेन विकून दरवर्षी नरेंद्र सिंह २५ लाखांची कमाई करतात. १० कोटींचा रेडा गोलू याला प्रचंड खुराक लागतो. त्यात ड्रायफूटचाही समावेश आहे. 4 / 10गोलू २ चे वजन तब्बल १५०० किलो आहे. उंची साडे पाच फूट असून साडे तीन फूट धिप्पाड शरीरयष्टी आहे. गोलू दरदिवशी ३५ किलो सूखा आणि हिरवा चाऱ्याशिवाय चणेही खातो. 5 / 10गोलू २ च्या डाएटमध्ये ७ ते ८ किलो गूळाचाही समावेश आहे. कधी कधी त्याला तूप आणि दूधही दिले जाते. गोलू २ च्या जेवणावर महिन्याला ३० ते ३५ हजार खर्च केला जातो. 6 / 10गोलू २ चे पालक नरेंद्र सिंह सांगतात की, गोलूच्या सेवेसाठी कुटुंबातील सर्वजण एकत्र येतात. चांगले सीमेनचा प्रयोग करून चांगल्या म्हैशी आणि रेडे तयार होऊ शकतील. जेणेकरून देशात दूध आणि दही याची कमतरता भासणार नाही असं त्यांनी म्हटलं. 7 / 10मी गोलूला घेऊन देशभरात हिंडतो. आज बिहारमध्ये आलोय. लम्पी आजारामुळे गेल्या वर्षी मी गोलू २ ला कुठल्याही स्पर्धेत घेऊन जाऊ शकलो नाही. आता गोलू चे वय ६ वर्ष आहे. या जातीच्या रेड्याची किंमत किमान २० वर्ष असते. त्यामुळे १४ वर्षापर्यंत मला गोलूला सुरक्षित ठेवायचे आहे असं नरेंद्र यांनी म्हटलं. 8 / 10हरियाणातील पानीपत जिल्ह्यातील डिडवारी गावात राहणाऱ्या नरेंद्र सिंह यांना पशुपालन क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. २०१९ मध्ये नरेंद्र सिंह यांना हा पुरस्कार देण्यात आला.9 / 10गोलू २ हा त्याचा पिता आणि आजोबांच्यापेक्षा खूप चांगला आहे. गोलू २ ने आतापर्यंत ३० हजार पारड्यांना जन्म दिला आहे. याच्या एका पारड्याचे नाव कोबरा ठेवले आहे10 / 10गोलू २ च्या सीमेनला केवळ भारतातच नाही तर परदेशातही डिमांड आहे. परंतु नरेंद्र सिंह कुणालाही सीमेन देत नाही तर केवळ शेतकरी पशुपालकांनाच गोलू २ चे सीमेन दिले जाते आणखी वाचा Subscribe to Notifications