Gucci launches dirty illusion jeans sold for 56 thousand people ready to waste money
बाबो! डाग लागलेल्या या जीन्सची किंमत वाचून व्हाल हैराण, व्हायरल झाले फोटो... By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 12:35 PM1 / 8सध्या २१वं शतक सुरू आहे आणि लोक बरेच फॅशनेबल झाले आहेत. वेगवेगळ्या स्टाइल आणि ट्रेन्डनुसार इथे कपड्यांचा पॅटर्न बदलतो. कधी टाइट जीन्सची फॅशन येते तर कधी लूज. एकदा ट्रेन्ड संपला की, ते कपडे आउट ऑफ फॅशन होतात. काही फॅशन ट्रेन्ड्स आकर्षक असतात, पण काहींना पाहून डोकं आपटून घ्यावं वाटतं. सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध ब्रॅन्ड Gucci च्या नव्या जीन्सचे फोटो व्हायरल झाले आहेत. ही जीन्स पाहिल्यावर कुणीही ती घ्यायला तयार होणार नाही. पण फॅशन वर्ल्डमध्ये याची डिमांड आहे. दिसायला जुनी आणि घाणेरडी वाटणाऱ्या या जीन्सची किंमत वाचून तुम्ही हैराण व्हाल. या घाणेरड्या जीन्ससाठी लोक ५६ हजार रूपये खर्च करायला तयार आहेत. 2 / 8सोशल मीडियावर gucci च्या या इको ऑर्गेनिक डेनिम पॅंटची चांगलीच चर्चा होत आहे. gucci या पॅंटची किंमत ५६ हजार ५०० रूपये ठेवली आहे.3 / 8प्रसिद्ध इटालियन ब्रॅन्डच्या या जीन्सवर पायांच्या आजूबाजूला गवताचे डाग दिसत आहेत. ही जीन्स तशीच तयार करण्यात आली आहे.4 / 8gucci ने हा जीन्स विंटर २०२० कलेक्शनमध्ये सामिल केलाय. तर या जीन्सला ग्रंज वाइब असं नाव देण्यात आलं आहे.5 / 8ही जीन्स पाहिल्यावर असं वाटतं की, फारच जुनी आहे. पण विश्वास बसणार नाही की, ही जीन्स नवीन आहे.6 / 8या जीन्सवरून फॅशन वर्ल्डमध्ये वाद पेटलाय. काहींना ही जीन्स आवडली तर काहींना बेकार वाटली. 7 / 8असं नाही की, gucci ने पहिल्यांदाच जुन्या स्टाइल आणि अशाप्रकारचे डिझाइन असलेले प्रॉडक्ट्स काढले. गेल्यावर्षी gucci ने असाच जुना दिसणारा स्पोर्ट शूज आणला होता.8 / 8जुना दिसणाऱ्या या स्पोर्ट्स शूजची किंमत ६४ हजार रूपये होती. आणखी वाचा Subscribe to Notifications