guns are sold in grocery stores in america shocking truth is reveled
येथे किराणा दुकानात सहज मिळतात बंदुका, जीवघेण्या घटनांचे प्रमाण जास्त...जाणून घ्या कुठे? By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 9:46 PM1 / 12अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर शस्त्रास्त्रांच्या विक्रीत एकदमच मोठी वाढ झाली होती. अगदी रिटेल स्टोअर वॉलमार्टलाही बंदुकांच्या खरेदीवर बंदी घालावी लागली होती. निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी अमेरिकेत हिंसाचार होईल, अशी भीती असतेच. फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवरही निवडणुकीच्या निकालांवरून हिंसाचाराचा अंदाज येतो. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, अमेरिका बंदुकांच्या विक्री आणि खरेदीमध्ये आघाडीवर आहे. जाणून घ्या, या देशात शस्त्रं खरेदी करणं किती सोपं आहे. 2 / 12अमेरिकेत, अनेक बंदुकधारी शाळा किंवा खरेदीच्या ठिकाणी गोळीबार करून जीव घेत आहेत. अलीकडच्या काळात अशा घटना वाढल्या आहेत. अशा प्रत्येक घटनेनंतर देशात बंदूक परवान्याच्या नियमांवर चर्चा होत असते. पण, तरीही येथे परवाना तुलनेने सहज मिळतो.3 / 12सध्या अमेरिकेतील प्रत्येक 100 लोकांपैकी सरासरी 88 लोकांकडे बंदूक आहे, याचं हेच कारण आहे. हा अभ्यास 2011 मध्ये स्मॉल आर्म्स सर्व्हेने (SAS) केला होता. त्यानंतरच्या 2017 च्या अभ्यासात या संस्थेला सापडलेली वस्तुस्थिती आणखी धक्कादायक आहे. आता अमेरिकेत माणसं कमी आणि बंदुका जास्त अशी स्थिती झाली आहे. 4 / 12देशातील प्रत्येक 100 नागरिकांमागे बंदुकांचं प्रमाण 120.5 वर पोहोचलं आहे. (जनगणनेनुसार, 2017 मध्ये देशाची लोकसंख्या 326 दशलक्ष होती. तर, देशातल्या लोकांकडे असलेल्या बंदुकांचा आकडा 393 दशलक्षांवर पोहोचला होता.) यासह अमेरिका हा नागरिकांकडे सर्वाधिक शस्त्रास्त्रं असलेला जगातला देश बनला आहे.5 / 12यानंतर येमेनचा क्रमांक लागतो. मात्र, या देशात प्रत्येक 100 माणसांमागे बंदुकांचं प्रमाण 52.8 एवढं आहे. पहिल्या क्रमांकावर असलेला अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेला येमेन यांच्यात कमालीची तफावत आहे. याचा परिणाम म्हणून, दरवर्षी अमेरिकेतील सुमारे 1,14,994 लोक कोणत्या ना कोणत्या बंदुकीच्या हिंसाचारात आपला जीव गमावतात. 6 / 12याचबरोबर, 2017 Pew Research survey ला सापडलेली वस्तुस्थिती आणखी रंजक आहे. या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेत माणसांपेक्षा शस्त्रांची संख्या जास्त असली तरी, देशातील केवळ 30 टक्के प्रौढांकडेच स्वतःची बंदूक आहे. म्हणजेच, देशातल्या केवळ 30 टक्के लोकांकडे संपूर्ण देशाच्या लोकसंख्येहून अधिक शस्त्रास्त्रे आहेत. काही व्यक्तींकडे 10 ते 20 बंदुकाही असल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच, इथल्या प्रत्येक व्यक्तीकडे बंदुका नाहीत.7 / 12मग, सहजपणे मनात विचार येतो की, यूएसमध्ये बंदूक खरेदी करण्यासाठी किमान वयोमर्यादा नाही का? गन कंट्रोल अॅक्ट 1968 (GCA) नुसार येथे रायफल किंवा कोणतीही छोटी शस्त्रे खरेदी करण्यासाठी किमान 18 वर्षांचे असणे अनिवार्य आहे. तर, हँडगन सारख्या इतर बंदुका खरेदी करण्यासाठी 21 वर्षांचे असणे आवश्यक आहे. कोणतंही राज्य हवं असल्यास ही वयोमर्यादा वाढवू शकतं, पण ती कमी करू शकत नाही.8 / 12याशिवाय, अनेक लोक कायदेशीररीत्या कोणत्याही प्रकारची शस्त्रे खरेदी करू शकत नाहीत. त्यापैकी असे लोक जे फरारी आहेत, जे समाजासाठी कोणत्याही प्रकारे धोक्याचे आहेत किंवा ज्यांना कोणत्याही प्रकारची मानसिक दुर्बलता आहे किंवा ज्यांना नैराश्याचा इतिहास आहे, ते शस्त्रे खरेदी करू शकत नाहीत. याशिवाय, दारूच्या नशेत राहत असल्याचं रेकॉर्ड असलेल्या तरुणांना शस्त्रं विकता येत नाहीत.9 / 12शस्त्र खरेदीदारांप्रमाणेच इथं शस्त्र विक्रेत्यांसाठीही वयोमर्यादा आहे. फेडरल फायरआर्म्स लायसन्स (FFL) नुसार, शस्त्र विक्रेता 21 वर्षांपेक्षा जास्त वयाचा असावा. व्यवसाय चालवण्यासाठी त्याच्याकडे स्वतंत्र जागा असावी, जी स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करणार्यांना जसं की पोलिसांना माहिती असावी.10 / 12विक्रेत्याने मानसिक स्थिती संतुलित असल्याचं प्रमाणपत्र दिलं, तरच त्याला शस्त्र विक्रीचा परवाना मिळतो. तसंच, विक्रेते कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतलेले असतील किंवा नशेत राहत असल्याची नोंद रेकॉर्डवर असेल, तरीही त्यांना परवाना मिळत नाही.11 / 12बंदुक खरेदी करण्यापूर्वी, खरेदीदाराची पार्श्वभूमी तपासली जाते. गन कंट्रोल X च्या 1993 च्या ब्रॅडी हँडगन हिंसा प्रतिबंध कायद्यानुसार (Brady Handgun Violence Prevention Act of 1993), हे करणं आवश्यक आहे. एनआयसीएस ही गुप्तचर संस्था एफबीआयची शाखा या तपासासाठी सक्रिय आहे. यासोबतच राज्य पोलीसही स्वतंत्रपणे तपास करू शकतात. 12 / 12बहुतेक यूएस राज्यांमध्ये, बंदुकीचा मालक त्याच्यासोबत शस्त्र घेऊन जाऊ शकतो. मात्र, यासाठी वेगळी परवानगी आवश्यक आहे. अनेक राज्यांमध्ये बंदुका झाकून ठेवण्याचा नियम आहे. तर, अनेक राज्यं बंदुकीच्या मालकाला उघड्यावर बंदूक घेऊन जाण्याची सूट देतात. काही राज्यांमध्ये, जसं की, न्यू जर्सी, सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगताना बंदुकीच्या मालकाला त्याचा ओळखपत्र आणि शस्त्र परवाना सोबत बाळगणं आवश्यक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications