Hanging train upside down train monorail floating railway Germany
इथे ट्रॅकच्या वर नाही तर खाली लटकून चालतात ट्रेन, फोटो बघून चक्रावून जाल... By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 11:26 AM1 / 7Hanging Train: भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाईन म्हटलं जातं. देशात हजारो रेल्वे लाखो लोकांना आपल्या ठिकाणावर नेऊन सोडतात. तुम्ही कधी रेल्वेने प्रवास केला असेल तर तुम्ही पाहिलं असेल की, रेल्वे लोखंडाच्या ट्रॅकवर चालतात. पण असंही एक ठिकाण आहे जिथे रेल्वे ट्रॅकवर नाही तर ट्रॅकखाली लटकून चालतात. हे जरा विचित्र वाटेल, पण असं एका ठिकाणी आहे. चला जाणून घेऊ कुठे आहेत या रेल्वे आणि कशा चालतात.2 / 7या रेल्वेला हॅंगिंग ट्रेन असं म्हणतात. ही ट्रेन भारतात नाही. ही ट्रेन जर्मनीमध्ये चालते. येथील ट्रेन ट्रॅकवर नाही तर ट्रॅकखाली लकटलेल्या असतात. अर्थातच या ट्रेनचा प्रवास इतर ट्रेनपेक्षा वेगळा ठरतो. लोकांना वाटतं की, या ट्रेनमधील लोक उलटे होऊन प्रवास करत आहेत. पण तसं नाहीये.3 / 7जर्मनीमध्ये Wuppertal Suspension Railway च्या अंतर्गत या ट्रेन चालवल्या जातात. ही ट्रेन दररोज 13.3 किलोमीटरचा प्रवास करते. यात त्या 20 स्टेशनवर थांबतात. असं अजिबात नाही की, लोक या ट्रेनमध्ये उलटे बसून प्रवास करतात. ते ट्रेन सामान्यपणे जसे ट्रेनमध्ये बसतात तसेच बसलेले असतात. ही ट्रेन जमिनीपासून 38 मीटर उंचीवरून चालते.4 / 7जे कुणी या हॅंगिंग ट्रेनला बघतात, ते हैराण होतात. असं सांगितलं की, जातं की, या ट्रेनची सुरूवात साधारण 121 वर्षाआधी 1901 मध्ये झाली होती. असं म्हटलं जातं की, जगातल्या सर्वात जुन्या मोनोरेलमध्ये याचा समावेश आहे. पर्यटक आवर्जून या ट्रेनमध्ये बसून वेगळा अनुभव घेतात.5 / 7या सस्पेंशन मोनोरेलची सुरूवात जर्मनीच्या वुपर्टाल शहरातून झाली होती. नदी, रस्ते, धबधबे आणि इतर काही ठिकाणांना क्रॉस करत ही ट्रेन लटकूनच पूर्ण प्रवास करते. गेल्या 121 वर्षांपासून या ट्रेन सुरू आहेत. या हॅंगिंग ट्रेनमधून रोज 82 हजार लोक प्रवास करतात.6 / 7या सस्पेंशन मोनोरेलची सुरूवात जर्मनीच्या वुपर्टाल शहरातून झाली होती. नदी, रस्ते, धबधबे आणि इतर काही ठिकाणांना क्रॉस करत ही ट्रेन लटकूनच पूर्ण प्रवास करते. गेल्या 121 वर्षांपासून या ट्रेन सुरू आहेत. या हॅंगिंग ट्रेनमधून रोज 82 हजार लोक प्रवास करतात.7 / 7या सस्पेंशन मोनोरेलची सुरूवात जर्मनीच्या वुपर्टाल शहरातून झाली होती. नदी, रस्ते, धबधबे आणि इतर काही ठिकाणांना क्रॉस करत ही ट्रेन लटकूनच पूर्ण प्रवास करते. गेल्या 121 वर्षांपासून या ट्रेन सुरू आहेत. या हॅंगिंग ट्रेनमधून रोज 82 हजार लोक प्रवास करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications