शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

#HappyBirthdayHrithik : लोकांना वेड लावून गेले ह्रितिक रोशनचे हे ५ लुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 7:55 PM

1 / 6
आज ह्रितीक रोशन याचा आज ४३वा वाढदिवस. त्याला अनेकदा अनेक राष्ट्रीय मॅग्झीन्स आणि संस्थांनी ‘सेक्सिएस्ट मेन’ म्हणून गौरवलं आहेच. त्याच्या लुक आणि फिटनेसकडे पाहता आपल्याला ते लगेच पटतं. त्याच्या या लुकमुळेच त्याला बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हटलं जातं. कोणत्याही चित्रपटात आणि कोणत्याही अॅवॉर्ड शोच्या सर्वच लुकमध्ये तो तेवढाच हॉट आणि स्मार्ट दिसतो. मात्र त्यापैकी आज पाहुयात त्याच्या काही चित्रपटातले लुक. कारण भूमिकांमध्ये विविधता हे त्याचं वैशिष्ट्य आहे.
2 / 6
१) कहो ना प्यार है - हा ह्रितिक रोशनचा पहिला चित्रपट २००० साली आला. त्याच्या वडिलांनी त्याला आपल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लाँच केलं. चित्रपटात तो कुठेच नवखा वाटला नाही. त्यात त्याने भरपुर अॅक्शन, डान्स, रोमान्स केला. त्याचा डान्स आणि बॉडी बघून प्रेक्षक पहिल्याच चित्रपटात त्याचे फॅन झाले होते.
3 / 6
२) बँग बँग - कॅटरिना कॅपसोबत ह्रितिक या चित्रपटात हॉट लुकमध्ये दिसून आला. जेम्स बाँडपेक्षा अधिक चांगला बाँड कोणी उभा करु शकेल तर तो ह्रितिक याची शाश्वती या चित्रपटातून मिळाली. मोठ मोठ्या चोऱ्या करणाऱ्या चोराची भूमिका यात त्याने केली असल्याने यात तुफान अॅक्शन होतीच शिवाय रोमान्सही होता.
4 / 6
३) जोधा अकबर - २००८ साली आलेल्या आशुतोष गोवारीकर यांच्या या चित्रपटात ह्रितिक शाही लुकमध्ये दिसून आला. सोबत ऐश्वर्या राय असल्याने दोघे खरंच एखाद्या राजघराण्यातील वाटत होते. राजासारखी शाही पारंपरिक वेशभूषा आणि वस्त्रालंकारांसह दोघांनी सर्वांची मनं जिंकली होती. मुघल सम्राट अकबर आणि त्याची पत्नी जोधाबाई यांच्यावर आधारीत या चित्रपटाला ए. आर. रहमान यांच्या गाण्यांनी चार चाँद लावले होते.
5 / 6
४) क्रिश सिरीज - देशातल्या सायन्स फिक्शन चित्रपटांतील एक चित्रपट जो लोकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतला. राकेश रोशन यांच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाखाली ही क्रिश सिरीज उभी राहीली. ‘कोई मिल गया’ या चित्रपटातील कथा यात पुढे नेण्यात आली आहे. प्रियंका चोप्रा, रेखा आणि नसुरद्दीन शहा या कलाकारांच्याही भूमिका या चित्रपटात होत्या.
6 / 6
५) अग्निपथ - धर्मा प्रॉडक्शनखाली २०१२ला या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. १९९०साली आलेल्या अमिताभ बच्चन अर्थात बिग बी यांच्या अग्निपथचा हा रिमेक होता. प्रियंका चोप्रा, ऋषी कपूर आणि संजय दत्त असलेल्या चित्रपटाने तुफान कमाई केली. ह्रितिक रोशनने या चित्रपटाला आपल्या अॅक्शन आणि ड्रामाने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
टॅग्स :Hrithik Roshanहृतिक रोशनPriyanka Chopraप्रियांका चोप्राRakesh Roshanराकेश रोशनbollywoodबॉलीवूड