Harnaam Kaur with beard mustache once wanted to commit suicide then life changed like this
कधीकाळी आत्महत्या करणार होती ही दाढी-मिशी असलेली तरूणी, एक निर्णयाने बदललं पूर्ण आयुष्य By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 3:56 PM1 / 6कधी तुम्ही एखाद्या मुलीला मुलांसारखी दाढी-मिशी आलेलं पाहिलंय का? जर पाहिलं असेल तरीही ते नकली असेल. पण आम्ही तुम्हाला एका अशा तरूणीबाबत सांगणार आहोत, जिच्या चेहऱ्यावर नेहमीच दाढी आणि मिशी दिसते. ब्रिटनमध्ये एका दुर्मीळ आजारामुळे भारतीय वंशाच्या एका तरूणीच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या काही भागांवर केस असामान्यपणे वाढले आहेत. तरूणीने अनेकदा केस हे कापले. इतकंच या तर हेअर रिमूव्हरचाही वापर केला. पण काही फायदा झाला नाही. अखेर तिने दाढी-मिशांसोबतच जगण्याचा निर्णय घेतला.2 / 6डेलीमेल वेबसाइटनुसार, हरनाम कौरच्या चेहऱ्यावर दाढी येऊ लागली होती तेव्हा ती केवळ ११ वर्षाची होती. पोलीसायस्टिक ओवरी सिंड्रोमुळे तिला दाढी येऊ लागली होती. काही काळाने हे केस तिच्या छातीवर आणि हातांवर पसरले. ज्यामुळे तिला नेहमीच लोकांच्या टोमण्यांचा सामना करावा लागला.3 / 6हरनाम कौर जेव्हा १६ वर्षांची होती तेव्हा तिला इंटरनेटवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्याआधी हरनामला तिचे हे केस आवडत नव्हते. ती आठवड्यातून दोनदा वॅक्स आणि ब्लीचिंग व शेविंग करत होती. त्यानंतर तिचे केस आणखी दाट होते गेले आणि परसत गेले. त्यामुळे तिने घराबाहेर जाणं बंद केलं. इतकंच काय तर तिने अनेकदा आत्महत्येचाही विचार केला.4 / 6फोटो बघणाऱ्यांना हेच वाटतं की, हा मुलगा आहे. पण हे सत्य नाही. सत्य तर काही वेगळंच आहे. त्यासोबतच ही तरूणी जिथेही जाते तेव्हा आपली दाढी-मिशी कापत नाही. ती डोक्यावर पगडीही बांधते. ज्यामुळे लोकांना ती सरदार दिसते.5 / 6आपल्या बोल्ड अंदाजामुळे हरनामचं आता सगळीकडून कौतुक केलं जातं. ती एक मोटिवेशनल स्पीकरसोबतच, यशस्वी सोशल मीडिया स्टार आणि मॉडल आहे. इन्स्टाग्रामवर तिचे १ लाख ६३ हजार फॉलोअर्स आहेत. चेहऱ्यावर दाढी असल्याने तिचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं आहे.6 / 6गेल्यावर्षी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरनेही तिचं भरभरून कौतुक केलं होतं कॉस्मो इंडियाच्या कव्हर पेजवर हरनाम कौरचा फोटो छापला होता. आता तिचं नाव जगभरात प्रसिद्ध आहे. तिने तिच्या कमजोरीला तिचं शस्त्र बनवलं. हेच कारण आहे की, लोकांना आता हरनामसोबत सेल्फी घेण्यासाठी लाइन लावावी लागते. आणखी वाचा Subscribe to Notifications