शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'हा' आहे जगातील सर्वात महागडा तांदूळ, किंमत पाहून तुम्हाला बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 4:05 PM

1 / 5
बासमती तांदळाचे नाव तुम्ही सर्वांनी ऐकले असेल. हा तांदूळ भारतातील सर्वात महाग तांदूळांमध्ये गणला जातो, परंतु जगातील सर्वात महाग तांदूळ दुसरा आहे. तो उन्हाळ्यात आणि वाळवंटी भागात पिकवला जातो.
2 / 5
दरम्यान, हा हसावी (Hassawai Rice) तांदूळ आहे. या तांदळाची किंमत ५० सौदी रियाल प्रति किलो आहे, जर त्याचे भारतीय रुपयात रूपांतर केले तर त्याची किंमत १००० ते ११०० रुपयांच्या दरम्यान होईल.
3 / 5
हसावी तांदूळ सरासरी दर्जाचा असतो, जो लोक ३०-४० रियाल (सुमारे ८०० रुपये) मध्ये खरेदी करतात. हा तांदूळ अरब देशांमध्ये बिर्याणी बनवण्यासाठी वापरला जातो. बरेच लोक याला रेड राईस देखील म्हणतात.
4 / 5
हा तांदूळ अतिशय कडक उन्हाळ्यात पिकवला जातो आणि नंतर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात त्याची काढणी केली जाते. या तांदळाचे पीक घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. या तांदळाचे उत्पादन इतर तांदळाप्रमाणेच घेतले जाते.
5 / 5
या भातशेतीसाठी आठवड्यातून फक्त पाच दिवस पाणी लागते. हसावी या तांदळाचे उत्पादन सौदी अरेबियामध्ये केली जाते. इथल्या लोकांना हा तांदूळ खूप आवडतो. वाळवंटी भागात पिकवलेला हा तांदूळ अतिशय चवदार असतो. या भातामध्ये पौष्टिकतेचे प्रमाणही खूप असते.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके