भारीच! घराचं नाव 'इंडिओ', गल्लीचं 'विमानतळ'; पठ्ठ्यानं असं पूर्ण केलं आपलं स्वप्न, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 7:08 PM
1 / 5 लोक आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळं काही करतात. रात्रंदिवस कष्ट करून अनेकजण आपलं स्वप्न सत्यात उतरवतात. 2 / 5 झारखंडमधील रांचीपासून २० किलोमीटर लांब असलेल्या महेशपूर गावाचे रहिवासी असलेले जाकिर खान यांनी आपल्या घराला विमानाच रूप दिलं आहे. 3 / 5 इतकंच नाही तर त्यांनी आपल्या घराचं नाव इंडिगो ठेवलं आहे. विशेष म्हणजे त्याचे घर जिथं आहे. त्या ठिकाणाला लोक विमानतळाच्या नावानं ओळखतात. आपल्या घराच्या छतावर त्यांनी विमानाचे मॉडेल तयार केले आहे. हे मॉडेल जाकिर यांनी स्वतः तयार केलं आहे. याकामासाठी त्यांनी गावातील लोकांनी मदत केली होती. हे संपूर्ण मॉडेल तयार करण्यासाठी जवळपास ३ महिन्यांचा कालावधी लागला. 4 / 5 हे घर बनवण्यासाठी जवळपास १० लाख रूपयांचा खर्च आला. त्यांनी सांगितले की, ''गावात कोणालाही माझं घर शोधण्यासाठी त्रास होणार नाही. याशिवाय माझ्या नातवंडानाही मनासारखं खेळता येईल. '' 5 / 5 जाकीर यांचे घर सध्या चर्चेचा विषय बनले आहे. त्यांच्या घराला पाहण्यासाठी गावातील लोकांसह गावाबाहेरूनही लोक येत आहेत. आतापर्यंत विमानात बसण्याची संधी कधीही मिळाली नाही. म्हणून त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी घराच्या छतावर विमान उभारलं. जाकीर यांनी सांगितले की, ''विमानाला रियल विमानाप्रमाणे तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या फक्त बाहेरचं काम झालं असून विमानाच्या आतील काम बाकी आहे.'' आणखी वाचा