haunted theme park in America six flags theme park aftermath Hurricane Katrina
हे आहे जगातील 'हाँटेड थीम पार्क', इथं ऐकू येतात चित्रविचित्र आवाज; असं काय घडलं होतं इथे? By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 6:21 PM1 / 10अमेरिकेतलं six flags amusement park हे एके काळी प्रसिद्ध थीम पार्क होतं. 146 एकर जागेत पसरलेलं हे पार्क म्हणजे आनंद जत्रा होती. आता मात्र हे पार्क बंद पडलंय. या झपाटलेल्या ठिकाणी येण्यास लोक घाबरतात.2 / 102005 मध्ये आलेल्या कॅटरिना चक्रीवादळाने (Hurricane Katrina) या थीम पार्कचा पूर्णपणे विनाश केला. तेव्हापासून हे उद्यान बंद आहे. 3 / 10या घटनेला 16 वर्षं झाली आहेत. तरीदेखील त्या दुर्दैवी घटनेच्या पाऊलखुणा अजूनही तशाच आहेत.4 / 10जेव्हा वादळ आलं तेव्हा या उद्यानात हजारो लोक आनंदाने बागडत होती. या चक्रीवादळात 1800 लोकांना आपला जीव गमवावा लागला. न्यू ऑर्लियॉन्स परिसरात 4 लाखांहून अधिक लोक बेघर व्हावं लागलं.5 / 10आता या उद्यानाची गणना जगातील सर्वाधिक झपाटलेल्या उद्यानांमध्ये केली जाते. असे म्हटलं जातं की, वादळात मरण पावलेल्यांचा आत्मा इथं भटकत असतो.6 / 10जो कोणी इथे येतो त्याला नेहमी वाटतं की कोणीतरी त्याला बघत आहे. लोकांनी अनेकदा या ठिकाणाहून विचित्र आवाज ऐकले असल्याचं सांगितलं जातं.7 / 10जेव्हा या ठिकाणी वादळ आलं होतं तेव्हा या पार्कचं अतोनात नुकसान झालं होतं. सगळे गेम, खेळणी उखडली गेली. वादळामध्ये जीव गमावलेल्यांच्या खाणाखुणाही इथे आहेत.8 / 10मळलेली टेडी बेअर, तुटलेली मूर्ती, वादळात नष्ट झालेल्या साहित्यांचे तुकडे पाहून एखाद्याचा आत्मा थरथरेल. असंच चित्र सध्या या पार्कमध्ये आहे.9 / 10लोकांना या पार्कमध्ये अनेक विचित्र अनुभव आलेले आहेत. त्यामुळे हे पार्क अद्याप बंदच आहे. वादळानंतरची इथली शांतता कुणालाही घाबरवू शकते.10 / 10अमेरिकेतली Most Haunted Place असं या बंद पडलेल्या पार्कचं वर्णन केलं जातं. आणखी वाचा Subscribe to Notifications