Heartbroken woman takes revenge on her cheating ex-boyfriend by sending him A TONNE of onions api
दगा देणाऱ्या बॉयफ्रेन्डला गर्लफ्रेन्डने शिकवला असा काही धडा, आता 'तो' रडेल दिवसरात्र भडाभडा! By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 11:38 AM1 / 10बॉयफ्रेन्ड आणि गर्लफेन्डची भांडणं ही काही नवीन नसतात. काहीना काही कारणांवरून दोघात भांडण होतं आणि दोघेही वेगळे होतात. काही सहज सगळं विसरून जातात तर काही लोकांच्या मनात सूडाची भावना निर्माण होते. चीनमध्येही एका गर्लफ्रेन्डने दगा देणाऱ्या बॉयफ्रेन्डला चांगलाच धडा शिकवला. 2 / 10झाओने कांद्याची डिलेव्हरी करणाऱ्या कंपनीला सांगितले की, जर बॉयफ्रेन्डसोबत काही संपर्क झाला नाही तर कांदे त्याच्या दरवाज्यातच सोडून या.3 / 10आता तिची अशी इच्छा आहे की, कांदा कापून तिच्या बॉयफ्रेन्डचेही तेवढेच अश्रू निघावे. बॉयफ्रेन्डवर सूड उगवण्यासाठी तिने केलेला हा कारनामा सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र)4 / 10या संपूर्ण वादावर झाओच्या एक्सने सांगितले की, 'ब्रेक झाल्यावर जी व्यक्ती रडत नाही, ती व्यक्ती खराब असते का?'. दुसरीकडे झाओच्या अशा वागण्यामुळे तिच्या एक्सचे शेजारी परेशान झाले आहेत. शेजारी म्हणाले की, झाओच्या बॉयफ्रेन्डला रडायला येवो न येवो त्यांना इतका कांदा पाहून रडायला येतंय.5 / 10कारण तिला त्याला रडवायचं आहे. तिच्या अश्रूंची जाणिव करून देण्यासाठी तिने हे केलं. यासाठी तिने ऑनलाइन 1 टन कांदे खरेदी केले आणि त्याच्या घरी पाठवले. 6 / 10झाओने कांद्याची डिलेव्हरी करणाऱ्या कंपनीला सांगितले की, जर बॉयफ्रेन्डसोबत काही संपर्क झाला नाही तर कांदे त्याच्या दरवाज्यातच सोडून या.7 / 10झाओने कांद्यांसोबत एक मेसेजही पाठवला. त्यात लिहिले होते की, 'एक्स! तुझ्यामुळे मी तीन दिवस रडले. आता रडायची वेळ तुझी आहे'.8 / 10झाओने स्थानिक मीडियाला सांगितले की, आम्ही गेल्या 1 वर्षापेक्षा जास्त काळापासून रिलेशनशिपमध्ये होतो आणि मला त्याला असं जाऊ द्यायचं नव्हतं. 9 / 10झाओने बॉयफ्रेन्डच्या घरी इतका कांदा पाठवला की, दरवाजा ब्लॉक झाला. इतके कांदे खाली काढण्यासाठीही अनेक तासांचा वेळ लागला. 10 / 10या संपूर्ण वादावर झाओच्या एक्सने सांगितले की, 'ब्रेक झाल्यावर जी व्यक्ती रडत नाही, ती व्यक्ती खराब असते का?'. दुसरीकडे झाओच्या अशा वागण्यामुळे तिच्या एक्सचे शेजारी परेशान झाले आहेत. शेजारी म्हणाले की, झाओच्या बॉयफ्रेन्डला रडायला येवो न येवो त्यांना इतका कांदा पाहून रडायला येतंय. आणखी वाचा Subscribe to Notifications