A hen gave birth to chick instead of eggs in odisha doctor also surprised
आश्चर्य! : इथं कोंबडीनं अंड्या ऐवजी पिल्लालाच दिला जन्म; पण कसं काय? डॉक्टरांनी सांगितलं कारण By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 10:21 PM1 / 8'आधी कोंबडी, की अंडे?' हा प्रश्न आपण अनेक वेळा ऐकला असेल. पण कधी असे ऐकले आहे का, की एखाद्या कोंबडीने अंड्या ऐवजी थेट पिल्लालाच जन्म दिली! हो, हे घडले आहे, ओडिशाच्या नुआपाडा येथे. येथे एका कोंबडीने पिल्लाला जन्म दिला आणि हे पाहून लोकही आश्चर्यचकित झाले.2 / 8नुआपाडा जिल्ह्यातील इच्छापूर गावात अंबिका मांझी यांच्या घरी एका कोंबडीने पिल्लाला जन्म दिला. मात्र, जन्मानंतर केवळ 10 मिनिटांतच या पिल्लाचा मृत्यू झाला. ही कोंबडी आपली 9 अंडी उबवत होती.3 / 8अंडी उबवतानाच ही कोंबडी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसली. मात्र, बराच वेळ ती त्या ठिकाणावरून न उठल्याने लोकांनी तिच्या जवळ जाऊन बघितले. 4 / 8या वेळी त्या लोकांना दिसून आले, की या कोंबडीने एका पिल्लाला जन्म दिला आहे. यावर त्या लोकांनी जवळपास कुठे फुटलेले आंडे दिसते का? याचाही शोध घेतला. मात्र त्यांनी जवळपास कुठलेही तसे अंडे दिसून आले नाही. 5 / 8यासंदर्भात नुआपाडा जिल्ह्याचे मुख्य पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. त्रिलोचन ढल म्हणाले, त्यांनी त्यांच्या आयुष्यात अशी घटना पहिल्यांदाच पाहिली. 6 / 8डॉक्टरांनी शक्यता वर्तवली, की कोंबडीच्या प्रजनन तंत्रातच अंडे बाहेर येण्या ऐवजी विकसित झाले असावे आणि पिल्लाचा जन्म झाला असावा. 7 / 8त्यांनी सांगितले, की अंडे शरीरातून बाहेर आल्यानंतर कोंबडी ते 21 दिवस उबवते आणि नंतर त्यातून पिल्लू बाहेर येते.8 / 8यापूर्वी 2018मध्ये केरळमधील वायनाडमधून आणि 2012मध्ये श्रीलंकेतून, अशीच घटना समोर आली आहे. मात्र, या दोन्हीही घटनांत पिल्लाचा मृत्यू झाला होता. (सर्व फोटो सांकेतिक आहेत.) आणखी वाचा Subscribe to Notifications