Here are amazing photos of worlds first space hotel to be build in space construction to begin
अंतराळात तयार होतंय जगातलं पहिलं हॉटेल; थिएटर, रेस्टॉरट अन् ४०० पाहूण्यांना मिळणार सुविधा, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 6:17 PM1 / 10दिवसेंदिवस जग वेगवेगळ्या क्षेत्रात अधिकच प्रगती करताना दिसून येत आहे. लोक आधी फक्त आकाशाला पाहून निरिक्षण करायचे पण लोक संपूर्ण जगभरासह आकाशातही फिरून येतात. प्रसिद्ध डिजायनिंग कंपनी ओर्बिटल असेंबली कॉर्पोरेशनं २०२७ पर्यंत आंतराळात एक हॉटेल तयार करण्याची योजना तयार केली आहे. 2 / 10कंपनीनं या हॉटेलचा डेमोसुद्धा तयार केला आहे. हे हॉटेल २०२५ ला बनवण्याची सुरूवात होणार असून २०२७ ला हे काम पूर्ण होणार आहे. 3 / 10हे हॉटेल ऑर्बिटल एसेंबली कॉर्पोरेशनकडून डिजाईन करण्यात आलं आहे. योजनेप्रमाणे २०२५ पासून हे हॉटेल तयार केलं जाणार आहे. दोन वर्षांत याचे बांधकाम पूर्ण होऊ शकतं.4 / 10याचे इंफ्रास्ट्रक्चर पृथ्वीवर तयार केले आहे. हे स्पेस स्टेशन गोलाकार आणि फिरतं असणार आहे. यात आर्टिफिशिल ग्रॅव्हिटी बनवली जाणार आहे. यात चंद्राप्रमाणे ग्रॅविटी तयार केली जाणार आहे. 5 / 10आंतराळात तयार होत असलेल्या या हॉटेलमध्ये लोकांना अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. यात अनेक रेस्टॉरंट, हेल्थ स्पा, सिनेमा हॉल यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त स्पेस हॉटेलमध्ये जिम, किचन आणि बारसुद्धा असणार आहे. याचे नाव वोयागार क्सा स्पेस स्टेशन ठेवलं जाणार आहे. 6 / 10या हॉटेलमध्ये अनेक रिंग्स तयार केल्या जाणार आहेत. यातील काही नासाला दिल्या जाणार आहेत. त्यात ते रिसर्च करू शकतील. या हॉटेलला सगळ्यात मोठा अविष्कार मानलं जात आहे. 7 / 10हे हॉटेल बनवण्यासाठी साधारपणे किती खर्च येईल याबाबत पूर्ण माहिती मिळालेली नाही. आंतराळात पाठवण्यात येत असलेल्या प्रत्येक सामानाची किंमत ५ लाख ८० हजारांपर्यंत असते. 8 / 10आंतराळात सुरू होत असलेल्या हॉटेलची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी इंजिनिअर्स काम सुद्धा करत आहेत.या हॉटेलमधून लोकांना बाहेरचा नजारासुद्धा पाहायला मिळणार आहे. 9 / 10वाचनालय, जीम अशा सगळ्याच सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या हॉटेलमध्ये काम करण्यासाठी काही जणांना स्पेशल ट्रेनिंग दिली जाणार आहे. 10 / 10वाचनालय, जीम अशा सगळ्याच सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या हॉटेलमध्ये काम करण्यासाठी काही जणांना स्पेशल ट्रेनिंग दिली जाणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications