शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एस्कलेटरचा ब्रश शूज स्वच्छ करण्यासाठी नसतो; जाणून घ्या त्यामागचं लॉजिक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 11:47 AM

1 / 14
एस्कलेटर्समुळे अनेकांचं दैनंदिन आयुष्य सुखकर झालंय. ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक फायदा होतो.
2 / 14
एस्कलेटर्स अर्थात सरकत्या जिन्यांमुळे दररोज जिना चढण्याचे श्रम वाचतात. त्यामुळे आता अनेक जण एस्कलेटर्सच्या वापराला पसंती देतात.
3 / 14
गेल्या काही वर्षांमध्ये देशातल्या रेल्वे स्थानकांवर एस्कलेटर्स लावण्यात आले. दररोज कोट्यवधी प्रवासी एस्कलेटर्सचा वापर करतात.
4 / 14
अनेकदा शेजारी जिने असूनही एस्कलेटर्सचा वापर होतो. विशेष म्हणजे कित्येक ज्येष्ठ नागरिकही या नव्या तंत्रज्ञानाचा अतिशय सराईतपणे वापर करतात. गुडघेदुखीसारखा त्रास असलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना एस्कलेटर्समुळे दिलासा मिळालाय.
5 / 14
तुम्ही एस्कलेटरचा वापर केला असल्यास, पायाजवळ असणाऱ्या ब्रशनं तुमचं लक्ष नक्की वेधलं असेल. अनेक जण या ब्रशनं चपलांवरील, बुटांवरील धूळ झाडून घेतात.
6 / 14
पायाजवळ ब्रश दिलाय याचा अर्थ तो शूज स्वच्छ करण्यासाठीच दिला असेल, असा अनेकांचा समज आहे. मात्र तो पूर्णपणे चुकीचा आहे.
7 / 14
एस्कलेटरवर असणाऱ्या ब्रशमागे महत्त्वाचं कारण आहे आणि त्याचा थेट संबंध एस्कलेटरच्या आणि त्याचा वापर करणाऱ्यांशी संबंधित आहे.
8 / 14
एस्कलेटर्सचे अपघात लक्षात घेतल्यास दोन प्रकार ठळकपणे लक्षात येतात. दोन पायऱ्यांमध्ये पाय आल्यानं आणि एस्कलेटर सुरू असताना त्याच्या बाजूला (ब्रशजवळ) पाय अडकल्यानं होणाऱ्या अपघातांचं प्रमाण मोठं आहे.
9 / 14
एस्कलेटर्सच्या पायऱ्यांच्या कोपऱ्यात पाय अडकून होणारे अपघात टाळण्यात ब्रश महत्त्वाची भूमिका बजावतात. एस्कलेटरच्या पायऱ्यांवर शक्य तितक्या मध्यभागी राहा. अगदी कोपऱ्यात उभे राहू नका, याची सूचना देण्यासाठी ब्रश लावले असतात.
10 / 14
एस्कलेटरच्या पायऱ्यांच्या कोपऱ्याजवळ उभे असताना पाय, शूजची लेस, कपडे अडकू नयेत याची काळजी ब्रश घेत असतो. त्यामुळे अपघात टाळता येतात.
11 / 14
एस्कलेटरच्या यंत्रणेत केस, धूळ, कचरा जाऊ नये याचीही काळजी ब्रश घेतो. त्यामुळे एस्कलेटरचं काम सुरळीत सुरू राहतं.
12 / 14
एस्कलेटरमध्ये कचरा अडकल्यास त्याचा स्फोट होण्याचीही शक्यता असते. अशी दुर्घटना टाळण्याचं महत्त्वाचं काम ब्रश करतात.
13 / 14
एस्कलेटर्सचा वापर १८९२ मध्ये सुरू झाला. १९८७ मध्ये एस्कलेटर्सचा सर्वात भीषण अपघात झाला.
14 / 14
लंडनमधल्या भूमिगत स्थानकावर झालेल्या अपघातात ३१ जणांचा मृत्यू झाला. एस्कलेटरमध्ये कागद, जखमेवर बांधायचं कापड अडकल्यानं ही दुर्घटना घडल्याचं नंतर समोर आलं.