1 / 7विद्यार्थ्यांच्या मनात शाळेबद्दल ओढ निर्माण व्हावी यासाठी बिहारच्या समस्तीपूरमध्ये वर्गांच्या भिंती रेल्वे गाडीच्या रंगात रंगवण्यात आले आहेत. 2 / 7शाळा प्रशासनाच्या या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेबद्दलची गोडी वाढली आहे. 3 / 7शाळा रेल्वेप्रमाणे रंगवण्यात आल्यापासून विद्यार्थ्यांची शाळेतली हजेरी वाढली आहे. 4 / 7शाळेला रेल्वेच्या रंगात रंगवल्यामुळे मतदानाचा टक्कादेखील वाढल्याचं दिसत आहे. छत्तीसगडच्या हजारीबागमध्ये हे दिसून आलं.5 / 7छत्तीसगडमध्ये काल (6 मे) मतदान झालं. शाळांचं पालटलेलं रुपडं पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. त्यामुळे या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढलेला दिसला. 6 / 7राजस्थानच्या अलवरमध्येही एका माध्यमिक शाळेला रेल्वेच्या डब्यांप्रमाणे रंगवण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती लक्षणीय वाढली. 7 / 7केरळच्या कासरगोड जिल्ह्यातल्या एका सरकारी शाळेच्या भिंतीदेखील रेल्वेच्या डब्यांप्रमाणे रंगवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे याच शाळेपासून देशातल्या शाळांना ही कल्पना सुचली.