शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Himalayan Viagra: नेमकं काय आहे हिमालयन वायग्रा, ज्याची सोन्यासोन्यापेक्षाही जास्त आहे किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 2:40 PM

1 / 10
Himalayan viagra : लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. नपुंसकता घालवण्यासाठीही लोक वेगवेगळी औषधं घेत असतात. जास्तीत जास्त लोक आयुर्वेदिक उपायांना प्राधान्य देतात.
2 / 10
अशात सोशल मीडियावर नेहमीच 'हिमालयन वायग्रा' बाबतच्या पोस्ट वाचल्या असतील. त्यात सांगितलं जातं की, ही लैंगिक शक्ती वाढवणारी एक खास जडीबुटी आहे. ही जडीबुटी फार महाग असल्याचंही बोललं जातं. पण याबाबत आणखी डिटेल्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
3 / 10
असं सांगितलं जातं की, या कीडा जडीबुटीचा वापर लैंगिक समस्या सोडवण्यासाठी केला जातो आणि बाजारात याची किंमत 20 लाख रूपये किलो आहे. या जडीबुटीला कॅटरपिलर फंगस आणि हिमालयन वायग्रा या नावांनीही ओळखलं जातं. याची किंमत सोन्या पेक्षाही जास्त आहे.
4 / 10
कारण असं मानलं जातं की, याचं सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. ही जडीबुटी पिवळा कॅटरपिलर कीडा आणि एक मशरूम मिळून तयार होते. याला कॅटरपिलर फंसग म्हटलं जातं कारण हे घोस्ट मॉथ लार्वाच्या डोक्यातून निघतं.
5 / 10
बऱ्याच लोकांच मत आहे की, हे पाण्यात उकडून, चहा करून, सूप आणि स्टू बनवून प्यायल्याने नपुंसकता आणि लिव्हरच्या समस्याही दूर होतात. ही जडीबुटी तेव्हा वाढते जेव्हा तापमान वाढतं. भूतान, चीन, भारत आणि नेपाळच्या 3300 मीटर ते 4,500 मीटर दरम्यान अशा भागात आढळते जिथे बर्फ वितळतो.
6 / 10
हिमालयन वायग्रा हिमालयात उंच ठिकाणी मिळते. जिथे बर्फ वितळतो. असं मानलं जातं की, घरासाठी बांधकाम, झाडांची कापणी आणि जलवायु परिवर्तन या अनेक कारणांमुळे कॅटरपिलर फंगसचं उत्पादन कमी झालं आहे.
7 / 10
हिमालयात केवळ 3 हजार मीटरपेक्षा उंचीवरील भागात ही आढळून येते. ही तेव्हा तयार होते जेव्हा कॅटरपिलर कीडा एक खासप्रकारचं गवत खातो आणि मेल्यानंतर त्याच्या आत ही जडीबुडी तयार होते. ही जडीबुटी अर्धा कीडा आणि अर्धी जडी असते. त्यामुळे याला कीडा जडी म्हटलं जातं.
8 / 10
इंटरनॅशनल जर्नल ऑफ हर्बस मेडिसिननुसार, यात कॉर्डिसेपिन अॅसिड, कॉर्डिसेपिन, डी-मॅनिटोल, पॉलीसेकेराइड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी1, बी2, बी6, बी12, सीरियन, झिंक, एसओडी, फॅटी अॅसिड, न्यूक्लियोसाइड प्रोटीन, कॉपर, कॅबोहाइड्रेट इत्यादी पोषक तत्व आणि खनिज आढळतात.
9 / 10
वेबएमडी आणि एनसीबीआय वर प्रकाशित एका रिपोर्टनुसार, हिमालयन वायग्राचा वापर जवळपास 1 हजार वर्षांपासून लैंगिक समस्यांच्या उपचारासाठी केला जातो. याने रात्री घाम येणे, हाइपरग्लेसेमिया, हाइपरलिपिडिमिया, अस्टेनिया, हृदयाची धडधड वाढणे यांच्या उपचारातही केला जातो. ही जडीबुटी इम्यून सिस्टम, कार्डियक वॅस्कुलर हेल्थ, श्वसन, किडनी, लिव्हरसंबंधी रोगांवरही फायदेशीर आहे.
10 / 10
वेबएमडी आणि एनसीबीआय वर प्रकाशित एका रिपोर्टनुसार, हिमालयन वायग्राचा वापर जवळपास 1 हजार वर्षांपासून लैंगिक समस्यांच्या उपचारासाठी केला जातो. याने रात्री घाम येणे, हाइपरग्लेसेमिया, हाइपरलिपिडिमिया, अस्टेनिया, हृदयाची धडधड वाढणे यांच्या उपचारातही केला जातो. ही जडीबुटी इम्यून सिस्टम, कार्डियक वॅस्कुलर हेल्थ, श्वसन, किडनी, लिव्हरसंबंधी रोगांवरही फायदेशीर आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स