history of lakme beauty products previously known as lasmi founded by JRD tata
Lakme आधी लक्ष्मी म्हणून ओळखलं जायचं! वाचा JRD TATA यांनी उभारलेल्या दर्जेदार ब्रँडची विलक्षण कहाणी By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 10:29 AM1 / 12Lakme हा ब्रँड आज सर्वांच्याच परिचयाचा असल. जगातील सर्व महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सना मात देणारा हा ब्रँड आज भारताची ओळख बनला आहे. उत्तम क्वालिटीसाठी हा ब्रँड लोकांच्या परिचयाचा आहे. आज हा प्रोडक्ट सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्रोडक्टपैकी एक मानला जातो. 2 / 12परंतु Lakme या ब्रँडची सुरूवात कशी झाली ही कहाणी अतिशय रंजक आहे. ही कहाणी जोडलेली आहे ती म्हणजे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, जेआरडी टाटा आणि देवी लक्ष्मी यांच्याशी.3 / 12आजपासून ७० वर्षांपूर्वीच म्हणजेच १९५२ मध्ये लॅक्मे हा ब्रँड लाँच करण्यात आला. याचं श्रेय जातं ते म्हणजे जेआरडी टाटा यांना. १९५० पर्यंत महिला होम ब्युटी प्रोडक्ट्स तयार करायच्या आणि त्यातच त्यांचं काम चालत होतं. ज्यांना शक्य होतं, ते बाहेरील देशातून ब्युटी प्रोडक्ट्स मागवत होते. 4 / 12यानंतर त्यांनी जेआरडी टाटा यांच्यासोबत ही कल्पना शेअर केली. टाटा यांच्याकडे उद्योग क्षेत्राचा चांगलाच अनुभवही होती. त्यांनादेखील ही कल्पना आवडली आणि तिकडूनच लॅक्मेची सुरूवात झाली.5 / 12तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे त्यावेळी नव्या उद्योगांच्या स्थापनेवरही काम करत होते. तेव्हाच त्यांना भारतीय ब्युटी प्रोडक्ट लाँच करण्याची कल्पना आली. त्यावेळी भारताचा आपला कोणताही असा ब्रँड नव्हता. जर हे प्रोडक्ट बजेट फ्रेन्डली असतील तर लोकं ते खरेदी करतील आणि समोर कोणतीही स्पर्धाही नसेल अशी अपेक्षा करण्यात आली होती. 6 / 12त्यावेळी लॅक्मे या नावावर खुप विचार करण्यात आला. आज आपण ज्याला लॅक्मे म्हणतो त्याचं सुरूवातीचं नाव ही लक्ष्मी असं होतं. जर तुम्ही इंटरनेटवरही पाहिलं तर १९५२ आणि त्यानंतरची काही वर्षे लक्ष्मी नावाच्या ब्युटी प्रोडक्ट्सची चांगली रेंज उपलब्ध होती.7 / 12लक्ष्मीच्या जाहिरातींमध्ये रेखा, हेमा मालिनी, जयाप्रदा यांच्यासह ५०-६० च्या दशकातल्या अनेक अभिनेत्री दिसून आल्या. लक्ष्मी लाँच झाल्यानंतर भारतात परदेशातील ब्युटी प्रोडक्ट्स येणं जवळपास बंद झालं. चित्रपटांमध्येही मेकअपसाठी लक्ष्मीच्याच ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करण्यात येत होता, तसंच या प्रोडक्टबद्दल लोकांचा विश्वासही वाढत होता. 8 / 12सामान्य महिलांनाही याचा वापर करता यावा यासाठी या प्रोडक्टची किंमत कमी ठेवण्यात आली होती. टाटा यांच्या भविष्यातील विचारांमुळेच लक्ष्मी हा प्रोडक्ट केवळ पाच वर्षांमध्ये मोठा झाला. आजही याचा दबदबा तितकाचकाय आहे. परंतु त्याच काळी दुसऱ्या उद्योगांची स्थापनाही सुरू होती. 9 / 12टाटा यांच्याकडे अनेक संधी होत्या, म्हणून त्यांनी १९६६ च्या जवळपास लक्ष्मी हा ब्रँड विकण्याचा निर्णय घेतला. अनेक नामांकित कंपन्यांनी त्यांच्या या ब्रँडसाठी बोली लावली. पण हिंदुस्तान लिव्हरचं नशीब चमकले. 10 / 12टाटांचा असा विश्वास होता की हिंदुस्तान लिव्हर ही एकमेव कंपनी आहे जी लक्ष्मीला अधिक प्रसिद्ध करू शकते. १९६६ नंतर लक्ष्मी ही कंपनी हिदुस्तान लिव्हरची झाली आणि त्यानंतर या ब्रँडचं नावंही बदललं.11 / 12या ब्रँडचं नवं नाव होतं लॅक्मे. लॅक्मे हे एक फ्रेन्च नाव आहे आणि याचाही अर्थ लक्ष्मी असाच आहे. कंपनीनं ब्रँडचं नाव तेच ठेवलं पण ते फ्रेन्च भाषेत घेतलं जाऊ लागलं. पुढे जाऊन हा ब्रँड तरूण वर्गासाठी आकर्षण ठरू लागला आणि त्याची व्याप्तीही अधिक वाढली. 12 / 12लॅक्मे ही भारतासोबतच परदेशातही पसंती मिळणारी मोठी कंपनी ठरली आहे. लॅक्मे आज १९०० कोटींचा यशस्वी व्यवसाय करणारी भारतातील सर्वात मोठी आणि प्रभावशाली कंपनी ठरली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications