शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतातील 'या' राजाला खुद्द हिटलरने आलिशान कार दिली होती गिफ्ट, दोघांची झाली होती भेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 3:36 PM

1 / 8
Hitler and Maharaja Bhupinder Singh : जगातील सगळ्यात निर्दयी हुकूमशहांपैकी एक अॅडॉल्फ हिटरलचे अनेक किस्से नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. त्याचे भारतासंबंधीही काही किस्से फेमस आहेत. त्यातीलच एक किस्सा म्हणजे हिटरलने भारतातील एक राजा एक आलिशान कार त्यावेळी भेट दिली होती. हिटलरने कार गिफ्ट केलेले भारतातील हे एकमेव राजा होते. ते म्हणजे महाराज भूपिंदर सिंह.
2 / 8
महाराज भूपिंदर सिंह हे पटियालाचे राजा होते. मुघलांचं शासन नाकारत पटियाला स्टेटची स्थापना 1763 मध्ये बाबा अली सिंह यांनी केली होती. नंतर इंग्रजांच्या मदतीने आणि नंतर 1857 च्या क्रांति दरम्यान इंग्रजांची मदत केल्याने पटियाला राज्य फारच मजबूत झालं होतं. पटियाला राज्य शान देशातच नाही तर परदेशातही वाढली होती.
3 / 8
वडील महाराज रजिंदर सिंह यांच्या निधनानंतर 9 वर्षीय महाराज भूपिंदर सिंह यांच्या हाती गादी आली. त्यांनी पुढे 38 वर्षे राज्य केलं. भूपिंदर सिंह हे राजकीय दृष्टीने फार मजबूत राजा मानले जात होते. चेंबर ऑफ प्रिंसेसचे महत्वपूर्ण सदस्य असल्याने त्यांना परदेशात फार मान होता. इंग्लंड, स्पेन, स्वीडन, नॉर्वे आणि इतरही देशांमध्ये भूपिंदर सिंह यांचे मित्र होते.
4 / 8
1932 मध्ये महाराज भूपिंदर सिंह हे जर्मनीच्या दौऱ्यावर होते. हिटलर आणि महाराज भूपिंदर सिंह यांच्या भेटीबाबत त्यांचे नातू राजा मालविंदर सिंह हे सांगत होते. याचा उल्लेख शारदा द्विवेदी यांचं पुस्तक Automobiles of the Maharajas मध्येही आहे.
5 / 8
मालविंदर सिंह सांगतात की, जर्मनीला पोहोचलेल्या आजोबांनी हिटलर यांना भेटीसाठी एक वेळ मागितली होती. पण त्यांनी खूप टाळाटाळ केली. शेवटी त्यांनी 5 ते 10 मिनिटे वेळ दिला. पण नंतर गप्पांमध्ये असे रमले की, ते एक तासापेक्षा जास्त सोबत बसले.
6 / 8
त्यानंतर दोघे लागोपाठ तीन दिवस भेटले. यादरम्यान हिटलरने महाराज भूपिंदर सिंह यांना अनेक गिफ्ट दिले. यात अनेक आधुनिक जर्मन हत्यार जसे की, लिग्नोस, वेल्थर आणि लगर ब्रांडच्या पिस्तुलांचा समावेश होता. त्यात सगळ्यात खास गिफ्ट होतं चमकदार मेबेच कार. (Image Credit : Bonhams.com)
7 / 8
या आलिशान कारचे तेव्हा केवळ 6 मॉडल तयार करण्यात आले होते. या लांबलचक कारमध्ये 5 इंजिन होते. ज्यामुळे तिच्या बोनटचा आकार मोठा होता. या कारमध्ये पाच लोक बसू शकत होते. इतकंच नाही तर या कारची सीट फोल्डही होत होती. ही कार जर्मनीहून जहाजाने भारतात आणण्यात आली आणि महाराज भूपिंदर सिंह यांच्या मोती महाल पॅलेसमध्ये इतर कारसोबत उभी करण्यात आली. (Image Credit : Bonhams.com)
8 / 8
जेव्हा ही कार पटियालामध्ये आली तोपर्यंत महाराजांचं निधन झालं होतं. त्यांचा मुलगा महाराज यादवेंद्र सिंह यांनी कार रजिस्टर केली. जिच्या नंबर प्लेटवर 7 लिहिलं होतं. नंतर ही कार अमेरिकेतील एका प्रायवेट संग्रहकर्त्याने 5 मिलियन डॉलर पेक्षाही जास्त किंमतीत खरेदी केली. हे इथंच थांबलं नाह. 2015 मध्ये ही कार एका दुसऱ्या व्यक्तीने खरेदी केली. पण त्याची ओळख आणि किंमत लपवण्यात आली.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके