Hoia Baciu Transylvania haunted forest the Bermuda triangle of Romania mysterious forest
हे जंगल मानलं जातं जगातलं सर्वात भीतीदायक ठिकाण, जाणून घ्या कुठे आहे हे ठिकाण... By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 4:12 PM1 / 8जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिते जाण्यासाठी लोक घाबरतात. असंच एक ठिकाण म्हणजे रोमानियाच्या ट्रान्सल्वेनिया प्रांतात आहे. इथे एवढ्या रहस्यमय गोष्टी घडतात की, लोक इथे जाण्यास घाबरतात. चला जाणून घेऊ या ठिकाणाबाबत... (All Images Credit : Social Media)2 / 8होया बस्यू असं या जंगलाचं नाव असून हे जगातल्या सर्वात भीतीदायक ठिकाणांपैकी एक आहे. इथे घडणाऱ्या रहस्यमय घटनांमुळे या ठिकाणाला 'रोमानिया या ट्रान्सल्वेनियाचा बरमूडा ट्रायंगल म्हटलं जातं.3 / 8या जंगलातील झाडे ही सरळ नाही तर वाकडी आहेत. ही झाडे दिवसा फारच भीतीदायक दिसतात. तसेच या ठिकाणीचा संबंध लोक भूत-प्रेत-आत्मा यांच्याशी असल्याचंही मानतात. तसेच लोक येथून अचानक गायब होतात असंही मानलं जातं.4 / 8हे जंगल क्लुज काउंटीमध्ये स्थित आहे. जे क्लुज-नेपोका शहराच्या पश्चिमेला आहे. हे जंगल जवळपास ७०० एकर परिसरात पसरलेलं आहे आणि असं म्हटलं जातं की, येथून शेकडो लोक बेपत्ता झालीत.5 / 8हे जंगल तेव्हा अधिक चर्चेत आलं जेव्हा एक शेळी चारणार व्यक्ती बेपत्ता झाला होता. ही व्यक्ती अचानक जंगलातून गायब झाली. महत्त्वाची बाब म्हणजे त्यावेळी त्याच्याकडे २०० शेळी होत्या.6 / 8काही वर्षांपूर्वी एका सैनिकाने जंगलात तपकडी बघितल्याचा दावा केला होता. तसेच १९६९ मध्ये एमिल बरनिया नावाच्या एका व्यक्तीने येथील आकाशात एक अलौकिक शरीर बघितल्याचा दावा केला होता. इथे आलेल्या काही पर्यटकांनीही असाच दावा केल्याचं बोललं जातं. 7 / 8असे म्हणतात की, काही लोक इथे फिरण्यासाठी आले होते. पण अचानक गायब झाले आणि पुन्हा परत आलेत. येथील लोकांचं असं मत आहे की, या जंगलात काही रहस्यमय शक्तींचा वास आहे. त्यांना विचित्र आवाजही ऐकायला मिळतात. (Image Credit : www.alldamnnight.com) 8 / 8एका आख्यायिकेनुसार, १८७० मध्ये या जंगलाच्या जवळच्या गावातील एका शेतकऱ्याची मुलगी चुकून जंगलात शिरली होती. नंतर ती अचानक गायब झाली. पण आश्चर्याची बाब म्हणजे ती मुलगी पाच वर्षांनी जंगलातून परत आली. मात्र, ती सगळंकाही विसरलेली होती. काही दिवसांनी तिचा मृत्यू झाल्याचेही सांगितले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications