honduran white bats which look like cotton ball photograph by supreet sahoo
डोळे विस्फारतील! पांढऱ्या वटवाघळांना पाहून लोक म्हणाले, हे तर कापसाचे गोळे? By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 3:03 PM1 / 10एका रेनफॉरेस्ट स्पेशालिस्टनं इन्स्टाग्रामवर एक पांढऱ्या वटवाघळांचा व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे सामान्यांच्या मनात वटवाघळांबद्दल भीती आहे. 2 / 10पण या पांढऱ्या वटवाघळांना पाहून तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही. कारण ही वटवाघळांची पिल्लं पांढऱ्या कापसाच्या गोळ्यासारखी दिसत आहेत.3 / 10एकानं कोस्टा रिकाच्या जंगलात या पांढऱ्या वटवाघळांचे फोटो टिपले आहेत. या पांढऱ्या वटवाघळांना होंडुरन व्हाइट बॅट म्हटलं जातं. जे होंडुरास निकारागुआ आणि पनामामध्येही आढळतात. 4 / 10इन्स्टाग्रामवर supreet_sahoo यानं हा व्हिडीओ शेअर केला. आहे. त्यानं स्वतःला रेनफॉरेस्ट स्पेशालिस्ट असल्याचं सांगितलं आहे. त्याला एक लाखांहून जास्त लोक फॉलो करतात. 5 / 10यांच्या पेजवर विविध पक्ष्यांची जबरदस्त फोटो आणि व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत या व्हिडीओला १३ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. 6 / 10या छोट्या वटवाघळांना कॅरेबियन व्हाइट टेंट-मेकिंग बॅट या कॉटन बॉल बॅट्स म्हटलं जातं. फोटो पाहायला मिळणाऱ्या या वटवाघळांची वाढ एवढीच असते.7 / 10नर हे मादीपेक्षा जास्त आकाराने मोठे असतात. ही वटवाघळं हेलिकोनिया झाडांच्या पानांमध्ये राहतात. त्यांना टेंट मेकिंग बॅटही म्हटलं जातं. 8 / 10ही वटवाघळं शाकाहारी असतात. झाडांच्या पानांमध्येही राहायला यांना आवडतं.9 / 10एका पानाच्या खाली सहा ते सात समूहानं वटवाघळं राहतात.10 / 10या दुर्लक्ष प्रजातीच्या वटवाघळांना वाचवण्याची गरज प्राणीमित्रांनी व्यक्त केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications