'या' खेकड्याचं निळं रक्त जगात आहे सगळ्यात महाग, किंमत इतकी की वाचून व्हाल हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 10:39 IST
1 / 11सामान्यपणे सगळ्या जीवांचं रक्त लाल असतं हे सगळ्यांना माहीत आहे. पण अनेकांना हे माहीत नसतं की, काही जीवांचा रक्त लाल नाही तर वेगळ्या रंगाचं असतं. अशाच एका खेकड्याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याचं रक्त निळं असतं आणि ते इतकं महाग असतं ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. आश्चर्याची बाब म्हणजे या जीवाच्या एक लिटर रक्ताची किंमत ११ लाख रूपयांपेक्षा जास्त आहे.2 / 11निळ्या रंगाचं रक्त असलेल्या या जीवाचं नाव आहे हॉर्स शू. हा एका दुर्मीळ प्रजातीचा खेकडा आहे. तज्ज्ञ सांगतात की, हॉर्स शू खेकडा जगातल्या सर्वात जुन्या जीवांपैकी एक आहे. हा जीव पृथ्वीवर सधारण ४५ कोटी वर्षांपासून आहे.3 / 11अटलांटिक, हिंद आणि प्रशांत महासागरात आढळणारा हा हॉर्स शू वसंत ऋतुत मे ते जून महिन्यात आढळून येतात. सर्वात खास बाब म्हणजे पूर्णिमेच्या रात्री ते हाय टाइडमध्ये समुद्र किनाऱ्यावर येतात.4 / 11आता खेकड्यांच्या किंमतीबाबत सांगायचं तर यांच्या एक लिटर निळ्या रक्ताची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ११ लाख रूपयांपर्यंत आहे. याला जगातला सर्वात महागड तरल पदार्थही म्हटलं जातं.5 / 11या खेकड्याच्या रक्ताचा वापर वेगवेगळ्या औषधांची निर्मिती करण्यासाठी केला जातो. असे सांगितले जाते की, हॉर्स शू खेकड्याच्या रक्ताचा वापर वैज्ञानिक १९७० पासून करत आहेत.6 / 11या रक्ताच्या माध्यमातून वैज्ञानिक उपकरणे आणि औषधे जीवाणूरहीत असल्याची तपासणी करतात. इतरही औषधांसाठी याचा वापर केला जातो.7 / 11अटलांटिक स्टेट्स मरीन फिशरीज कमीशननुसार, दरवर्षी ५ कोटी हॉर्स शू खेकड्यांचा वापर मेडिकल कामांमध्ये केला जातो.8 / 11तज्ज्ञ सांगतात की, हॉर्स शू खेकड्याच्या निळ्या रक्तात तांब असतं. सोबतच एक खास रसायन असतं जे कोणत्याही बॅक्टेरियाच्या आजूबाजूला जमा होतं आणि त्यांची ओळख पटवतं.9 / 11हॉर्श शू खेकड्यांचं रक्त त्यांच्या हृदयाजवळ छिद्र करून काढलं जातं. एका खेकड्यातून तीस टक्के रक्त काढलं जातं आणि नंतर त्यांना समुद्रात सोडलं जातं.10 / 11एका रिपोर्टनुसार, दहा ते तीस टक्के खेकडे रक्त काढण्याच्या प्रक्रियेदरम्यानच मरतात. त्यानंतर वाचल्याने मादा खेकड्यांना प्रजननासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. 11 / 11सध्या जगात हॉर्स शू खेकड्यांच्या केवळ चार प्रजाती शिल्लक राहिल्या आहेत. अनेक प्रजाती तर प्रदूषणामुळे धोक्यात आहेत. या प्रजातीच्या खेकड्यांवर नेहमीच धोका असतो. त्यांच्या किंमती रक्तामुळे त्यांची ब्लॅक मार्केटिंगही भरपूर होते.