उष्णतेचा कहर! ही आहेत जगातील सर्वात 'हॉट' ठिकाणं By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 3:34 PM
1 / 5 दश्त-ए-लुत, इराण: हे जगातील सर्वाधिक उष्ण ठिकाण आहे. इथलं तापमान 70 अंश सेल्सिअसहून अधिक असतं. या ठिकाणी 2004 मध्ये 70 अंश सेल्सिअस, तर 2005 मध्ये 70.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. 2 / 5 क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया: बॅडलँड म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या क्वीन्सलँडचा एक मोठा वाळवंटानं वेढला गेला आहे. 2003 मध्ये या ठिकाणी 69.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. 3 / 5 फ्लेमिंगो माऊंटन, चीन: या भागाचा समावेश जगातील सर्वात उष्ण प्रदेशांमध्ये होतो. 2008 मध्ये या भागात 66.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. 4 / 5 केव ऑफ द क्रिस्टल, मेक्सिको: मेक्सिकोमधील नैका येथील एका गुहेमधील तापमान 58 अंश सेल्सिअस इतकं आहे. गुहेतील हवा अतिशय उष्ण असल्यानं येथे कोणतंही संशोधनदेखील करता येत नाही. 5 / 5 अल-अजीजियाह, लीबिया: उन्हाळ्यात या भागातील तापमान 48 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचतं. 1992 मध्ये इथलं तापमान तब्बल 57.8 अंश सेल्सिअसवर गेलं होतं. आणखी वाचा