How did Bruce Lee die? Why is the world still trying to figure it years later api
Bruce Lee च्या मृत्युबाबत इतके दावे वाचूनच चक्रावून जाल, आजही त्याचा मृत्यु बनून आहे रहस्य! By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 12:51 PM1 / 12क्वचितच असा कुणी माणूस असेल ज्याला ब्रूस ली चं नाव माहिती नसेल. ब्रूस ली सारखी फिटनेस आणि एनर्जी आजपर्यंत कुणातही पाहिली गेली नाही. असे सांगितले जाते की, ब्रूस ली इतका फास्ट होता की, लाइटचा स्विच ऑन केल्यावर बल्ब पेटण्याआधीच तो बेडवर लेटलेला असायचा.2 / 12मेडिकल सायन्सनुसार, फिट असणे आणि निरोगी होणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही फिट आहात याचा अर्थ हा आहे की, तुम्ही निरोगी आहात. ब्रूस ली च्या अचानक झालेल्या मृत्यूने सर्वांनाच धक्का दिला होता. आजपर्यंत त्याच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं गेलेलं नाही. त्याच्या मृत्यूबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. चला त्यातील काही प्रसिद्ध आम्ही तुम्हाला सांगतो. 3 / 12सर्वात जास्त प्रचलित असलेल्या कथेला सिद्ध करण्यासाठी पोस्टमार्टमचा हवाला दिला जातो. Autopsy च्या रिपोर्टनुसार, ब्रूस ली Pain Killer औषधांमुळे मरण पावला होता. ही औषधे तो डोकेदुखी दूर कऱण्यासाठी घेत होता. 4 / 12असे सांगितले जाते की, त्याच्या मृत्यूच्या ऑफिशिअल रिपोर्टमध्ये लिहिले होते की, त्याचा मृत्यू आकस्मिक दुर्घटनेमुळे झाला. त्याला Celebral Edema नावाचा आजार झाला होता. ज्यात व्यक्तीच्या मेंदूवर सूज येते. 5 / 12Wikipedia नुसार, ब्रूस ली चा मृत्यू 1973 मध्ये Enter The Dragon सिनेमाच्या शूटींगवेळी त्याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी ली गोल्डन हार्वेस्ट स्टुडिओमध्ये काम करत होता. तेव्हा अचानक बेशुद्ध झाला. नंतर त्याला औषध देण्यात आलं. थोडा वेळ त्याला बरं वाटलं. पण हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला. 6 / 12ब्रूस ली च्या मृत्यूबाबत सर्वात वादग्रस्त जी कथा आहे ती ही आहे की, ब्रूल ली जीवनाच्या सुरूवातीच्या काही वर्षात फार लोकप्रिय झाला होता. त्याने एका अमेरिकन महिलेशी लग्न केलं होतं. नंतर त्याला दोन मुलं झाली. जेव्हा ब्रूस ली चा मृत्यू झाला तेव्हा त्याचं शरीर त्याच्या रूममध्ये नाही तर त्याच्या पत्नीच्या रूममध्ये होता. 7 / 12अनेकांनी असा अंदाज लावला की, ब्रूस ली याला त्याच्या अमेरिकन पत्नी विष देऊन मारलं. पण पोलिसांनी तर त्याच्या मृत्यूला आकस्मिक दुर्घटना सांगितलंय. 8 / 12सर्वांच असं मत आहे की, पोलिसांनी ब्रूस लीच्या चाहत्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून असं केलं होतं. सर्व सेलिब्रिटी प्रमाणे ब्रूस ली चे चाहते देखील आक्रामक झाले असते. त्यामुळे पोलिसांनी त्याला विष दिल्याची बाब सार्वजनिक करण्याऐवजी दुसरा पर्याय लोकांना सांगितला. 9 / 12त्याला विष देण्यात आल्याच्या दाव्यात किती सत्यता आहे हे माहीत नाही. पण काही लोकांनी असाही दावा केला होता की, त्याला स्लो पॉयजन दिलं जात होतं. त्यामुळे त्याच्या शरीरात ट्रेस केलं गेलं नाही.10 / 12 अनेक लोक तर यामागे अमेरिकेचा हात असल्याचंही सांगतात. त्यांचं असं मत आहे की, अमेरिकेकडून चीनच्या या आंतरराष्ट्रीय हिरोचं यश पाहवलं गेलं नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या एजंटला ब्रूस ली ची पत्नी केलं आणि त्याची हत्या केली.11 / 12ब्रूस ली च्या मृत्यूबाबत काही लोक अंधविश्वासही सांगतात. काही लोकांनी दावा केला की, ब्रूस ली च्या परिवाराल श्राप होता. त्यामुळे त्याचा मृत्यू 32 व्या वर्षी झाला. 12 / 12आता खरं काय हे ना आम्हाला माहीत आहे ना तुम्हाला. पण इतकं मात्र नक्की की मार्शल आर्ट्सच्या या महान कलाकाराने इतक्या लवकर जगाचा असा निरोप घेणं फारच दु:खद होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications