शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

किती असतं विमानाचा मायलेज? लागणाऱ्या इंधनाचा आकडा वाचून चक्रावून जाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 2:40 PM

1 / 10
जेव्हाही कुणी चारचाकी किंवा दोनचाकी गाडी खरेदी करतं तेव्हा सर्वातआधी त्या गाडीचे फीचर्स बघतात. इतर फीचर्ससोबत सगळेजण गाडीचा मायलेज किती देते म्हणजे एका लीटर पेट्रोल किंवा डीझलमध्ये किती अंतर चालू शकते.
2 / 10
कारण जास्तीत जास्त लोक चांगल्या मायलेजच्या गाडीला प्राधान्य देतात. पण काही लोकांसाठी केवळ गाडी स्पीड जास्त महत्वाचा वाटतो.
3 / 10
एका सामान्य बाइकचा मायलेज ३५ ते ४५ किमी प्रति लीटर इतका किंवा त्यापेक्षा थोडा जास्त असतं. तर काही गाड्यांचा मायलेज १५ ते २० पर्यंत असतो.
4 / 10
पण तुम्हाला माहीत आहे का की, एका विमानाचा किती मायलेज असतं? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर बहुतांश लोकांकडे नसतं. चला जाणून घेऊन याचं उत्तर...
5 / 10
इतर वाहनांच्या तुलनेत विमानाचं इंजिन अधिक मजबूत लावलं जातं. जे इंधनावरच चालतं. पण ते पेट्रोल आणि डीझलपेक्षा वेगळं असतं.
6 / 10
भारताबाबत सांगायचं तर आपल्याकडे जेट फ्यूल नावाच्या इंधनाचा वापर होतो. तर याच्या प्रति लीटरची किंमतही वेगवेगळी असते.
7 / 10
बोइंग ७४७ सर्वात मोठ्या विमानांपैकी एक आहे. ज्यात एकाचवेळी ५०० प्रवाशी प्रवास करू शकतात. या विमानाच वेग ९०० किमी प्रति तास सांगितला जातो. मीडिया रिपोर्टनुसार बोइंग ७४७ मध्ये एक सेकंदात चार लीटर इंधन खर्च होतं.
8 / 10
बोइंग ७४७ सारखे मोठे विमान एक मिनिटात २४० लीटर इंधन खर्च करता. तेच असे विमान एका लीटरमध्ये केवळ ०.८ किमीपर्यंत प्रवास करू शकतात.
9 / 10
तसेच बोइंग ७४७ च्या तुलनेत एअरबस A32 विमान एका सेकंदात ०.६८३ लीटर इंधन खर्च करतात. त्यासोबतच बोइंग विमान एका तासात १४.४०० लीटर इंधन खर्च करतं.
10 / 10
एका अंदाजानुसार, टोकियो ते न्यूयॉर्कपर्यंतचा प्रवास करण्यासाठी एका बोइंग ७४७ विमानाला १८७,२०० लीटर इंधनाची गरज पडते. टोकियो ते न्यूयॉर्कचा प्रवास १३ तासांचा आहे.
टॅग्स :airplaneविमानPetrolपेट्रोलInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके