शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शुभ मानलं जाणारं नीलम रत्न खरं आहे की खोटं कसं ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 3:14 PM

1 / 10
नीलम हे शनीचा चमत्कारी रत्न असून याचा वापर अनेकजण लाभ होण्यासाठी करतात. पण नीलम रत्न विकणारे लोकांची अनेकदा फसवणूक करतात. त्यामुळे याचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी लागते. अशात नीलम खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेतली तर खरं नीलम रत्न तुमचं नशीब बदलू शकतो. त्यामुळे खऱ्या नीलम रत्नाची ओळख कशी पटवावी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 10
खरं नीलम रत्न चमकदार, स्वच्छ आणि मोरपंखी रंगाचं असतं. नीलम ग्लासमध्ये टाकलं तर त्याची निळी किरणे दिसू लागतात. यावरून ते खरं आहे की खोटं हे कळेल.
3 / 10
असेही मानले जाते की, हे रत्नं खरं की खोट हे ओळखण्यासाठी गायीच्या दुधाचा वापर करा. म्हणजे गायीच्या दुधात हे रत्न थोडा वेळ ठेवलं तर दुधाचा रंग निळा होतो. अशीही तुम्ही नीलमची ओळख पटवू शकता.
4 / 10
रक्तदाब वाढतो - खरं नीलम रत्न जर मुठीत घट्ट धरलं तर गरम वाटू लागतं आणि अनेकदा काही लोकांचं रक्तदाबही वाढतो. तेच जर खऱ्या नीलम रत्नाडजवळ एखादा कण आणला तर तो त्याला चिकटतो.
5 / 10
दोन लेअर - खऱ्या नीलममध्ये लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला दोन थर दिसतील. हे दोन्ही लेअर एकमेकांच्या समांतर असतात. नीलममधील वेगवेगळ्या लेअर बघण्यासाठी ते सूर्यप्रकाशाकडे धरून पाहिल्यास तुम्हाला दोन लेअर दिसतील. त्यात तुम्हाला पिवळा प्रकाश दिसला तर ते खरं नीलम रत्न आहे. (Image Credit : eBay)
6 / 10
नीलमचं वजन - खऱ्या नीलम रत्नाच्या वजनावरूनही याच्या खरेपणाची ओळख पटवता येते. याच्या एका सेमी पीसचं ३.९८ ग्रॅम वजन असतं. त्यामुळे नीलम घेण्यापूर्वी त्याचं वजन करा. (Image Credit : pinterest.com)
7 / 10
ज्योतिषांच्या सल्ल्याशिवाय वापरू नका - नीलम रत्न हे डाव्या हाताच्या मधल्या बोटात ४ ते ६ कॅरेटच्या सोन्याच्या किंवा धातुच्या अंगठीत घातलं जातं. याने लाभ होतो आणि शनीच्या दुष्प्रभावांपासूनही मुक्ती मिळते. नीलमला शनीच्या दिशेने घालणे फार शुभ मानले जाते. पण ज्योतिषांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करू नये.
8 / 10
नीलम हे एक असं रत्न आहे ज्याचा प्रभाव तुम्हाला लगेच बघायला मिळतो. याचा वापर करताना सकारात्मक परिणामांसोबतच नकारात्मक परिणामही होतात. ग्रह-नक्षत्र आणि वेळेनुसारच याचा वापर केला पाहिजे. हे रत्न वापरल्यास समृद्धी लाभते, असं मानलं जातं.
9 / 10
नीलमचा काही प्रभाव होतो की नाही हे तपासण्यासाठी नीलम सुरूवातीचे काही दिवस झोपताना डोक्याच्या बाजूला ठेवून झोपा किंवा कपड्यात गुंडाळून सतत तुमच्या सोबत ठेवा. सगळं काही सामान्य असेल तरच त्याची अंगठी करा. जर काही नकारात्मक घडत असेल तर याचा वापर करू नका.
10 / 10
असे मानले जाते की, जर तुम्ही नीलम रत्नाचा वापर केला तर अनेक वर्षांपासून रखडलेली कामे पूर्णत्वाला येऊ लागतात. कोणतेही अर्धवट राहिलेले काम, किंवा एखादी अडचण आल्याने बंद पडलेले काम अचानक सुरु होऊन पूर्णही होते.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAstrologyफलज्योतिष