How much paint is needed to paint white house
व्हाईट हाऊसला कलर करण्यासाठी किती पेंट लागतो? आकडा वाचून चक्रावेल डोकं! By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 4:01 PM1 / 7White House USA : नुकत्याच अमेरिकेत निवडणुका पार पडल्या. लवकर अमेरिकेला नवे राष्ट्राध्यक्ष मिळणार आहेत. पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष बनतील. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसोबतच नेहमीच वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसही चर्चेत येत असतं. 2 / 7अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्या परिवारासोबत व्हाईट हाऊसमध्ये राहतात. पण अनेकांना हे माहीत नसेल की, व्हाईट हाऊसला आधी प्रेसिडेंट पॅलेस आणि प्रेसिडेंट हाऊस म्हटलं जात होतं. पण १९०१ मध्ये या इमारतीचं नाव व्हाईट हाऊस करण्यात आलं. 3 / 7सामान्यपणे सगळ्याच देशांच्या राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांची घरे ही आलिशान आणि मोठी असतात. मात्र, अमेरिकेतील व्हाईट हाऊसची भव्यता वेगळीच आहे. 4 / 7६ मजली या इमारतीमध्ये १३२ रूम, ३५ बाथरूम, ४१२ गेट, १४७ खिडक्या, २८ फायर प्लेस, ८ पायऱ्या आणि ३ लिफ्ट आहेत.5 / 7व्हाईट हाऊस ३ मुख्य भागात विभागला आहे. यात ईस्ट विंग, वेस्ट विंग आणि एक्झिक्युटीव्ह रेसिडेंसचा समावेश आहे. ६ मजली इमारतीच्या २ फ्लोरमध्ये राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचा परिवार राहतो. बाकी भागांमध्ये इव्हेंट्स, पाहुणे आणि बिल्डींग स्टाफ राहतात.6 / 7जसे की नावातून स्पष्ट होतं व्हाईट हाऊस आपल्या रंगामुळे ओळखलं जातं. व्हाईट हाऊसला व्हाईट कलरने पेंट करण्यासाठी ५७० गॅलन कलरची गरज पडते. म्हणजे साधारण २ हजार लीटरपेक्षा जास्त कलर.7 / 7मीडिया रिपोर्टनुसार व्हाईट हाऊसला व्हिसपर व्हाईट कलरने पेंट केलं जातं. सामान्यपणे ४ ते ६ वर्षानंतर व्हाईट हाऊसला पेंट केलं जातं. आणखी वाचा Subscribe to Notifications