How Is Porn Dealing With Coronavirus?
लॉकडाऊनमध्ये मालामाल झाल्या पॉर्न स्टार्स, कमाईची 'ही' आयडिया जगभरात ठरली सुपरहिट... By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 1:53 PM1 / 10कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जास्तीत जास्त बिझनेसना फटका बसला. पण यूरोप आणि अमेरिकेतील पॉर्न स्टार्ससाठी हा काळ फारच फायदेशीर राहिला. गेल्या काही महिन्यात त्यांची रॅकिंग आणि कमाई दोन्हींमध्ये कमालीची वाढ झाली आहे. 2 / 10द रिंगर वेबसाइटने याबाबत एक रिपोर्ट प्रकाशित केलाय. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, सर्वच स्टुडिओ बंद झाले आहेत. त्यामुळे पॉर्न स्टार स्वत:चे व्हिडीओ स्वत: शूट करत आहेत आणि पेड साइट्सवर सब्सक्रायबरसाठी शेअर करत आहेत. यामुळे अनेक पॉर्न स्टार्सने एका महिन्यात हजारो डॉलर्स कमाई करत आहेत. इतकेच नाही तर त्यांची रॅंकिंग आणि लोकप्रियताही वाढली आहे.3 / 10रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, सर्वच पॉर्न स्टार्सची कमाईल वाढली आहे. कारण लॉकडाऊन दरम्यान घरात बसलेले लोक मोठ्य़ा प्रमाणात पॉर्न बघत आहेत. अशात पॉर्न इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार त्यांचं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत.4 / 10स्टुडिओ बंद असल्याने अनेक पॉर्न स्टार्सनी त्यांच्या घराचा एक कोपराच स्टुडिओमध्ये बदलला आहे. सिनेमांचं एडिटींग आणि सेलिंगचं काम एकतर ते स्वत: करतात किंवा ऑनलाइन करून घेतात. शिकागोतील एका पॉर्न स्टारने सांगितले की, तिच्या वेबसाइटची कमाई फेब्रुवारीमध्ये 2 हजार डॉलरने वाढून एप्रिलमध्ये 75000 हजार डॉलरवर पोहोचली आहे. 5 / 10तसेच फॅन बेसही वाढला आहे. जास्तीत जास्त पॉर्न स्टार्सच्या त्यांच्या वेबसाईट्स आहेत. त्यामुळे यातून जी कमाई ते करत आहेत ती त्यांची आहे. पॉर्न इंडस्ट्री सोडलेली मिया खलिफाने सांगितले की, तिने अनेक वर्षांच्या करिअरमध्ये केवळ 12 हजार डॉलरची कमाई केली आहे. पण लॉकडाऊनने सगळं काही बदललं आहे.6 / 10द बोल्ड अॅन्ड ब्युटीफूल टीव्ही मालिकेत काम करणारी मॅटलेंड वार्डने नंतर पॉर्न इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली. आता ती 43 वर्षांची झाली आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. आता ती तिच्या पॉर्न चॅनलमधून मोठी कमाई करत आहे.7 / 10जगातली सर्वात पॉर्न वेबसाइट पॉर्न हबचं ट्रॅफिक मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये 22 टक्क्यांनी वाढलं आहे. ब्रिटीश पॉर्न स्टार एला ह्यूजेसने द इकॉनॉमिस्टसोबत बोलताना सांगितले की, 'तिने आता निर्मात्यांसोबत काम करणं सोडलं. आता तिची स्वत:ची वेबासाइट आहे. 8 / 10यातून दर महिन्याला तिला 12 पाउंड मिळतात. सगळे व्हिडीओ स्वत: शूट करते. तसेच ज्या फॅन्सना व्हिडीओवर छोटा संवाद साधायचा त्यासाठी ती 40 डॉलर ते 500 डॉलर वेगळे घेते.9 / 10कॉमस्कोर मीडिया मॅट्रिक्सनुसार, डिसेंबर 2005 पर्यंत अॅडल्ट वेबसाइटचे 63.4 मिलियन यूनिक व्हिजीटर्स होते. तेव्हापासून आतापर्यंत जगभरात इंटरनेटचा प्रसार अधिक झाला. त्यामुळे व्हिजीटर्स चार पटीने वाढले आहेत. त्यावेळी पॉर्न इंडस्ट्रीची एकूण कमाई 12 बिलियन डॉलर होती. आता ती अनेक पटीने वाढली आहे.10 / 10गेल्या ऑक्टोबर 2019 मध्ये पत्रकार ज्यूली बिंदेलने एक स्टोरी द स्पेक्टेटर्सच्या अमेरिकन एडिशनसाठी लिहिली होती. त्यात त्याने लिहिले होते की, आपण जेवढा विचार करतो, पॉर्न इंडस्ट्री त्यापेक्षा कितीतरी मोठी आहे. या इंडस्ट्रीत दरवर्षी 90 बिलियनची कमाई होते. याच्या तुलनेत हॉलिवूडची कमाई 10 बिलियन डॉलर आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications