टाकाऊपासून टिकाऊ! जुन्या वस्तूंचा वापर करून असं सजवा घर By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 2:30 PM
1 / 8 घरं स्वच्छ आणि सुंदर ठेवायला प्रत्येकालाचं आवडतं. सुंदर आणि हटके गोष्टींच्या मदतीने घर आकर्षकरित्या सजवलं जातं. 2 / 8 घरामध्ये अशा अनेक वस्तू असतात ज्या जुन्या झाल्यामुळे वापरल्या जात नाही. मात्र टाकाऊपासून टिकाऊ यावरून जुन्या वस्तूंचा वापर करून घरी सुंदररित्या सजवता येते. कसं ते जाणून घेऊया 3 / 8 चहा, कॉफी, कुकीजचे रिकामे कंटेनर्स असतात. ते फेकून देण्याऐवजी वेगवेगळ्या रंगांनी रंगवा. कंटेनर्सचा वापर पेन स्टँडसारख्या अन्य गोष्टींसाठी करता येईल. 4 / 8 काचेच्या बॉटल्सचा वापर करून सुंदर फ्लॉवर पॉट तयार करता येतो. तसेच यामध्ये लाईट्स टाकून लँपही करता येतो. 5 / 8 नवीन कप आणल्यानंतर जुने कप तसेच पडून राहतात. त्याचा वापर करून आकर्षक मेणबत्त्या अथवा दिवे तयार करता येतात. 6 / 8 घर सजवण्यासाठी जुन्या गिटारचा वापर करता येईल. गिटारमध्ये रंगीबेरंगी लाईट्स लावता येतील. 7 / 8 प्लास्टिक बॉटल्सचा वापर करून फेस्टिव डेकोरेशन करता येतं. तसेच बॉटल्समध्ये रोपं लावू शकतो. प्लास्टिक बॉटल्सचा वापर करून शोभेच्या वस्तू तयार करता येतात. 8 / 8 अनेकांच्या घरामध्ये एखादी जुनी शिडी असते. मात्र त्याचा वापर फारसा केला जात नाही. अशा शिडीला नवीन रंग देऊन भन्नाट वेगळा असा लूक देता येईल. रंग लावून त्याचा वापर हा छोट्या वस्तू ठेवण्यासाठी करता येतो. आणखी वाचा