शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगभरात पिवळे वाघ असताना हे पांढरे वाघ नेमके आले कुठून?, जाणून घ्या इंटरेस्टींग रहस्य.....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 12:21 PM

1 / 10
साधारण १० दिवसांपूर्वी निकारागुआतील प्राणी संग्रहालयात पांढऱ्या वाघाचा जन्म झाला. पिवळ्या रंगाच्या वाघिणीने बछड्याचा पांढरा रंग पाहून त्याला सोडून दिलं. त्यानंतर या बछड्याचं काळजी प्राणी संग्रहालयातील कर्मचारी घेत आहेत. या बछड्याचं नाव नाइव्ह ठेवण्यात आलं आहे. स्पॅनिश भाषेत नाइव्हचा अर्थ स्नो म्हणजे बर्फ होतो. या बछड्याचे आई-वडील भारतातून पाठवण्यात आलेले पिवळ्या रंगाचे बंगाल टायगर्स आहेत. मग आता प्रश्न उभा राहतो की, पिवळ्या रंगाच्या वाघ-वाघिणीला पांढऱ्या रंगाचं बछडं कसं झालं? (All Image Credit : Getty Images)
2 / 10
भारत, नेपाळ, बांगलादेश आणि भूतानमध्ये वाघांची जी प्रजाती आढळते त्याला बंगाल टायगर म्हटलं जातं. जैवविज्ञानाच्या भाषेत पॅंथेरा टिगरिस टिगरिस असं म्हणतात. हे सामान्यपणे पिवळ्या-नारंगी रंगाचे आणि अंगावर काळे पट्टे असलेले वाघ असतात. पण यांच्याकडून पांढरा वाघ जन्माला येणं हैराण करणारंही आहे आणि प्रश्नही आहे.
3 / 10
पांढरे वाघ बंगाल टायगरच्या प्रजातीपासून वेगळे नाहीत. ते एकच आहेत. पण त्यांचा पांढरा रंग जीनच्या रेसेसिव्ह म्यूटेशन म्हणजे कमजोर पडल्याने असं होतं. याला पिगमेंट जीन असंही म्हणतात. पिगमेंट जीनची एक स्ट्रेट रेसेसिव्ह असल्याने तो रंग यायला हवा तो येत नाही.
4 / 10
वाघांमध्ये SLC45A2 नावाचा पिगमेंट जीन असतो. हा जीन घोडे, कोंबड्या आणि माश्यांमध्येही आढळतो. पण वाघांमध्ये जेव्हा या जीनचा एक स्ट्रेट कमजोर पडतो तेव्हा याचा रंग पिवळा किंवा नारंग येत नाही. काळ्या रंगाच्या पट्ट्यांवर काही प्रभाव पडत नाही. वाघ पांढरा रंग आणि काळ्या पट्ट्यांसह व्हाइट टायगर बनतो.
5 / 10
भारतात पांढऱ्या रंगाच्या वाघांचा रेकॉर्ड १५व्या शतकात केलं गेलं होतं. याची चर्चा जास्त तेव्हा झाली जेव्हा भारतातील एका जंगलात फिरत असलेल्या वाघाला १९५८ मध्ये शिकारी दरम्यान मारण्यात आलं.
6 / 10
भारतात १९५१ मध्ये मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यात एक मादा पांढरा वाघ मोहन पकडण्यात आला होता. असं मानलं जातं की, सध्या देशात जेवढे पांढरे वाघ आहेत ते त्याचेच वंशज आहेत. त्यासोबत ब्रीडिंग सेंटरवर मोहनकडून अनेक वाघिणींना गर्भवती करण्यात आलं. त्यातून देशात पांढरे वाघ जन्माला आणले गेले होते.
7 / 10
मोहन याचीच वंशावळ आजही भारतासहीत अनेक देशात आहे. वैज्ञानिक यांना अल्बीनो वाघही म्हणत नाहीत. कारण अल्बीनो वाघांचा आकार आणि वजन कमी होतं. पण यांचा आकार आणि वजन सामान्य वाघांप्रमाणेच असतं. ब्रीडिंट सेंटरवर प्रयत्न हा असतो की, आता व्हाइट टायगरकडून कमी ब्रीडिंग केली जावी. कारण यांच्यात अनेक प्रकारचे आजार असतात. याने वाघांच्या पुढील पिढीला नुकसान पोहोचण्याची भीती आहे.
8 / 10
निकारागुआमध्ये जन्माला आलेला पांढरा वाघ नाइव्हचे आई-वडील पिवळ्या रंगाचे आणि काळ्या पट्टयाचे होते. पण त्यांचा पंजोबा हा पांढरा वाघ होता. याचा अर्थ हा आहे की नाइव्हचे आई-वडिलांच्या शरीरात रेसेसिव जीन होता. जो नाइव्हच्या गर्भधारणेवेळी सक्रिय झाला. त्यामुळे नाइव्ह पांढरा वाघ म्हणून जन्माला आला.
9 / 10
बंगाल टायगर्सची प्रजाती धोक्यात आहे. इंटरनॅशनल यूनियन फॉप कंजरव्हेश ऑफ नेचरच्या नुसार, सध्या जंगलामध्ये बंगाल टायगर्सची संख्या २५०० इतकी शिल्लक आहे. पांढरे वाघ याच प्रजातीचे आहेत. त्यामुळे त्यांची गणती वेगळी केली जात नाही.
10 / 10
चीनमध्ये पेकिंग यूनिव्हर्सिटी बायोलॉजिस्ट शुजिन लुओ म्हणाले की, पांढरे वाघ फार दुर्मिळ आहेत. इतर वाघांप्रमाणे यांनाही सुरक्षित ठेवलं पाहिजे. हे खरं आहे की, यांच्या आत नैसर्गिकपणे एक जीन कमजोर आहे. पण याचा अर्थ हा नाही की, याच्या संरक्षणावर आपण लक्ष देऊ नये. हे भविष्यात वाघांची नवीन प्रजाती विकसित करण्यात सक्षम आहेत. सोबतच बंगाल टायगर्सची प्रजातीचं संतुलन ठेवण्यातही मदत होईल.
टॅग्स :TigerवाघInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके