Huge dinosaur fossil dug up in south France
शेकडो वर्षापूर्वीच्या महाकाय डायनासोरचे अवशेष हाती, वजन पाहून तुम्हीही थक्क व्हाल! By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 12:03 PM1 / 5जमिनीतील अवशेष शोधून काढणाऱ्या जीवाश्मो संस्थेला मोठं यश हाती लागलं आहे. दक्षिण फ्रान्समधील एका टीमने महाकाय डायनासोरच्या पायाचे अवशेष शोधून काढलेत. जवळपास 6.5 फूट लांब आणि 500 किलो वजनाची डायनासोरच्या मांडीचे हाड जमिनीतून शोधण्यात यश आलं आहे. 2 / 5अल जजीराच्या वृत्तानुसार फ्रान्समधील एका उत्खननावेळी 24 जुलै 2019 रोजी एका प्राण्याची हाडे मिळाली. हे अवशेष 14 कोटी वर्षापूर्वींचे असल्याचा दावा केला जात आहे. 3 / 5दुर्मिळ संशोधन करणाऱ्या या टीमने फ्रान्समधील उत्खननाच्या जागेवर जाऊन संशोधन केलं. हे अवशेष शाकाहरी डायनासोरच्या प्रजातीतील सर्वात मोठी जाती आहे. 4 / 5नॅशनल म्यूझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीच्या टीमने जमिनीतून हे अवशेष शोधून काढण्यात यश मिळालं आहे. 5 / 5या संशोधन करणाऱ्या टीमला आत्तापर्यंत 7,500 हाडांचे तुकडे मिळाले आहेत. या परिसरात 2010 पासून उत्खनन करण्याचं काम सुरु आहे. याठिकाणी मिळालेल्या हाडांचे तुकडे 40 प्रजातीच्या डायनासोरची आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications