शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आजारी पत्नीला पती बोलला, तुला एकटीला सोडणार नाही, मीदेखील येणार अन् खरोखरंच...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 3:06 PM

1 / 10
लोकप्रिय फेसबुक पेज ह्यूमन ऑफ न्यूयॉर्कमध्ये एका पती-पत्नीच्या प्रेमाची अनोखी गोष्ट शेअर करण्यात आली आहे. जी त्यांच्या मुलीने सांगितली आहे. या मुलीने सांगितल्या प्रमाणे तिचे वडील खूप अजब रसायन होतं, नेहमी हसत खेळत राहायचे. पत्नीसाठी गाणं गायचे.
2 / 10
जेव्हा पत्नी आजारी होती तेव्हाही पतीने तिचा हात हातात घेत तिला जगण्यासाठी प्रेरित करत होता. या मुलीने दोघांच्या नावाचा खुलासा केला नाही. या व्यक्तीला ५ मुली होत्या. जेव्हा कधी ते बाहेरून येत होते तेव्हा घरी आल्यानंतर सर्व मुलींना रांगेत उभं करुन आईवडील दोघंही किस करत होते. हे त्यांचे प्रेम होते.
3 / 10
जेव्हा सगळं कुटुंब एका ट्रीपला गेले होते. तेव्हा वडिलांनी आईसाठी संपूर्ण प्रवासात गाणी गायली. आमच्यासाठी हे सगळं नॉर्मल नव्हतं. वडील आईसाठी बॉलिवूडचे गाणे गात होते.
4 / 10
आई नेहमी सांगायची, मी आयुष्यभर प्रत्येक मिनिट वडिलांवर प्रेम केले आहे. मी त्यांच्यासाठीच आहे. वडिलांना ज्या गोष्टी आवडतात तेच आई करायची. जेव्हा आई आजारी पडली, तिला ब्रेन ट्यूमर झाल्याचं आढळल्याने आम्हाला धक्का बसला, अनेकदा आईची सर्जरी केली होती. प्रत्येक सर्जरीनंतर आईची तब्येत खालावत होती.
5 / 10
जेव्हा आईला नीट चालता येत नव्हतं तेव्हा पप्पा नेहमी तिचा हात हातात घेत चालत असतं. आईच्या गालावर हात लावून ते कुराण वाचत, तेव्हा ते तहानभूकही विसरत होते.
6 / 10
शेवटच्या क्षणापर्यंत वडिलांनी आईला सांगितले तू एकटी जाणार नाही, मी तुझ्यासोबत असेल. आईच्या मृत्यूनंतर वडिलांना तिच्या कब्रीच्या बाजूला प्लॉट घेतला. ते दररोज आईला दफन केलेल्या जागी जात असे.
7 / 10
जेव्हा सगळी कार्यवाही पूर्ण झाली त्यानंतर वडील शांत झाले. दोन दिवस ते कोणाशी बोलले नाहीत. तिसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं मला बरं वाटत नाही. तेव्हा त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी मी तयार होत होती.
8 / 10
मी जेव्हा बूट घालण्यासाठी खाली वाकली, तेव्हा ते जमिनीवर कोसळले, जोपर्यंत रुग्णवाहिका येणार होती तोपर्यंत वडिलांनी शेवटचा श्वास घेतला होता.
9 / 10
ही फेसबुक पोस्ट ३१ ऑगस्टला शेअर करण्यात आली, जी आतापर्यंत ३० हजार जणांनी शेअर केली आहे. ४ लाखापेक्षा जास्त लाईक्स, १८ हजार कमेंट आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, ही गोष्ट मनाला भिडणारी आहे. खरं प्रेम काय असते ते या दोघांनी दाखवून दिलं.
10 / 10
प्रत्येक तासाला वडील विचारत होते कब्रिस्तानात फोन केला का? इतकं आईच्या प्रेमात वडील बुडाले होते. त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला होता.
टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट