humans woman can smell fear research shows
भीतीचा वास घेणं शक्य पण, फक्त महिलांनाच, रिसर्चमधुन आणखीही धक्कादायक दावे... By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 3:58 PM1 / 10प्रत्येक व्यक्तीला काही प्रमाणात भीती ही वाटतेच. तुम्ही भीतीबद्दल अनेक गोष्टी आतापर्यंत ऐकल्या असतील. अशा परिस्थितीत, एक प्रश्न उद्भवतो की 'भीती'चा वास घेता येतो किंवा जाणवता येतो का?2 / 10एका संशोधनात सापडलं आहे. या अभ्यासाच्या परिणामांनुसार, भीतीचा वास घेणं शक्य आहे, परंतु जर एखादी स्त्री असेल तरच हे घडू शकतं.3 / 10या संशोधनात २१४ व्यक्तींचा समावेश होता. ज्यात पुरुष आणि महिलाही होत्या प्रत्येकाला मास्कच्या साहाय्याने घामाच्या नमुन्यांचा वास घ्यायचा होता.4 / 10वैज्ञानिकांनी निरीक्षण केल्यानंतर असं दिसून आले की, भीतीने त्रासलेल्या लोकांचा वास जाणवल्यानंतर महिलांचं वर्तन आश्चर्यकारकपणे बदललं.5 / 10मानसशास्त्रज्ञांनी या कामासाठी सभागृहात सार्वजनिक भाषण ऐकणाऱ्या लोकांसह क्रीडांगणात उपस्थित असलेल्या लोकांच्या घामाचे नमुने गोळा केले होते. 6 / 10या प्रक्रियेदरम्यान महिलांना खेळ खेळण्यास देखील सांगण्यात आलं होतं.7 / 10हेनरिक हेन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितलं की, अभ्यासाचे परिणाम महिलांच्या सामाजिक विकासाद्वारे देखील समजू शकतात.8 / 10उदाहरणार्थ, चिंताग्रस्त व्यक्तीच्या घामाचा वास घेतल्यानंतर स्त्रिया विश्वासु गोष्टींवर कमी विश्वास ठेवतात9 / 10अशावेळी स्त्रिया अधिक जोखीम घेण्याचा प्रयत्न करतात.10 / 10सामान्य परिस्थितीत मात्र स्त्रिया अशा विचित्र वागत नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications