शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दोन बहिणी मिळून शेअर करतात एक बॉयफ्रेन्ड; एकाशीच करायचंय लग्न, पण आहे एक अडचण....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 10:22 AM

1 / 10
ऑस्ट्रेलियात राहणारी एना आणि लूसी डिसींक तशा तर जुळ्या बहिणी आहेत. पण त्यांनी त्यांचं जीवन एकत्र जगण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना प्रत्येक गोष्ट सोबत करणं आवडतं. इतकेच काय तर त्यांचा बॉयफ्रेन्डही एकच आहे.
2 / 10
या दोन्ही बहिणी काही दिवसांपूवी टीएलसी एक्स्ट्रीम सिस्टर्स नावाच्या शोमध्ये सोबत दिसल्या होत्या. या बहिणींबाबत दावा केला जातो की, या जगातल्या एकमेकींच्या सर्वात जवळ असलेल्या बहिणी आहेत. कारण त्या प्रत्येक गोष्ट सोबत करतात. त्यांना एकत्रच प्रेग्नेंटही व्हायचं आहे.
3 / 10
लूसी आणि एना सोबत जेवण करतात, एकसारखे कपडे घालतात. सोबत वर्कआउट करतात. इतकेच काय तर दोघी सोबतच आंघोळ करतात. सोबतच वॉशरूमला जातात आणि सोबतच झोपतात.
4 / 10
आश्चर्याची बाब म्हणजे एना आणि लूसीचा बॉयफ्रेन्डही एकच आहे. ४० वर्षीय बेन एना आणि लूसी यांच्यासोबतच झोपतो. दोघी तर असंही म्हणाल्या की, त्यांना एकत्रच बेनच्या बाळाची आई व्हायचं आहे. मात्र, ऑस्ट्रेलियातील एका कायद्याने त्यांच्यासाठी अडचण निर्माण केली आहे.
5 / 10
लूसी आणि एनाची भेट बेनसोबत २०१२ मध्ये झाली होती. व्यवसायाने मेकॅनिक बेनला बघताच दोघीही त्याच्याकडे आकर्षित झाल्या होत्या. या दोघींनी बेनसोबत लग्नही करायचं आहे. पण ऑस्ट्रेलियातील एका कायद्यामुळे असं होऊ शकत नाहीये.
6 / 10
ऑस्ट्रेलिया मॅरेज अॅक्ट १९६१ नुसार, एकच व्यक्ती दोन लग्ने करू शकत नाही. रिअॅलिटी टीव्ही शोवर याबाबत बोलताना दोघी भावनिक झाल्या. कारण दोघींनी बऱ्याच महिन्यांपासून लग्नाची तयारी करून ठेवली आहे.
7 / 10
त्या म्हणाल्या की, आम्ही जुळ्या आहोत. आम्हाला पार्टनर बेनसोबत लग्न करायचं आहे. पण ऑस्ट्रेलियातील कायदा सांगतो की, असं करणं बेकायदेशीर आहे.
8 / 10
लूसी याबाबत म्हणाली की, एकाच बॉयफ्रेन्डसोबत राहण्याचा अर्थ आम्ही नेहमी एकत्र राहू शकतो. आणि आमच्या नात्यात काहीच अडचण नाही. बेन याची काळजी घेतो की, आम्ही दोघीही आनंदी रहाव्या.
9 / 10
द सनसोबत बोलताना लूसी आणि एना म्हणाल्या होत्या की, आम्ही बेनला आधीच सांगितलं होतं की, आम्ही येणार तर पॅकेजमध्येच येणार. आमच्यापैकी एकीला निवडण्याची अपेक्षा ठेवू नको.
10 / 10
यावर बेन त्यांना म्हणाला होता की, तो दोघींचा बॉन्ड समजू शकतो आणि त्याला दोघींसोबतही रिलेशनशिप ठेवण्यास काहीच अडचण नाही.
टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाJara hatkeजरा हटके