If you have old 1 rupee note, you can earn lakhs of rupees in one night
तुमच्याकडे असेल 1 रुपयांची जुनी नोट, तर एका रात्रीत कमवू शकता लाखो रुपये By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2021 6:01 PM1 / 10 नवी दिल्ली: तुम्हाला जुन्या नोटा जमा करण्याची आवड असेल किंवा तुमच्या घरात जुन्या नोटा असतील, तर तुम्ही एका रात्रीत लखपती बनू शकता.2 / 10 भारतात जुन्या वस्तुंचे अनेकजण शौकिन आहेत. याच जुन्या वस्तुंमध्ये पैशांचाही समावेश आहे. बऱ्याच जणांना जुने पैसे जमा करण्याची आवड असते. यासाठी ते लाखो रुपये मोजायलाही तयार होतात.3 / 10 जुन्या नोटा आणि नाण्यांची सध्या चांगलीच मागणी वाढत आहे. यासाठी अनेकजण लाखो रुपये द्यायला तयार होतात. आज आम्ही तुम्हाला 1 रुपयाच्या नोटेबद्दल सांगणार आहोत, ज्याला विकून तुम्ही लखपती होऊ शकता.4 / 10 सध्या एक रुपयाची नोट चलनातून बाद झाली आहे, पण ही नोट आजही तुम्हाला लाखो रुपये देऊ शकते. अनेक वेबसाइटवर या जुन्या नोटांचा लिलाव होत असून, यात त्या नोटेवर लाखो रुपयांची बोली लावली जात आहे.5 / 10 या साइटवर विकण्यासोबतच तुम्ही दुर्मिळ नाणेदेखील खरेदी करू शकता. या साइटवर जुन्या नोटा विकल्या जातात, असा साइटचा दावा आहे.6 / 10 1 रुपयांच्या नोटेचे बंडल 45,000 रुपयांपर्यंत विकल्या जात आहे. CoinBazzar वेबसाइटवर 1 रुपयांच्या बंडलची किंमत 49,999 रुपये आहे.7 / 10 भारत सरकारने फार पूर्वीच एक रुपयाची नोट चलनातून बाद केली आहे. पण, सध्या या नोटेला ऑनलाइन चांगली व्हॅल्यू मिळत आहे.8 / 10 यासाठी तुम्हीला वेबसाइटवरील शॉप सेक्शनमध्ये जाऊन नोट्सवर क्लिक करुन नोट्स बंडलमध्ये जावं लागेल. 9 / 10 देशात अनेक वेबसाइट आहेत, जशी ईबे, कोइनबाजार, कलेक्टर बाजार अशा साइट्सवर 1, 5 आणि 10 रुपयांच्या नोटा विकू शकता.10 / 10 महत्वाचं म्हणजे, तुमच्या नोटेवर 1957 मधील गव्हर्नर एचएम पटेल यांची स्वाक्षरी आणि सीरियल नंबर 123456 असावा. आणखी वाचा Subscribe to Notifications