Immortal species of jellyfish which never dies science
पृथ्वीवरील एकुलता एक असा जीव जो कधीच मरत नाही, तो अमर आहे! By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 10:34 AM1 / 9हा जगातला एकुलता एक असा जीव आहे जो कधीच मरत नाही. त्यामुळे या जीवाच्या वयाचा अंदाज लावला जाऊ शकत नाही. या जीवाची खासियत ही आहे की, सेक्शुअली मच्युअर झाल्यानंतर तो पुन्हा कमी वयाच्या स्टेजमध्ये येतो. त्यानंतर पुन्हा विकसित होतो. असं सतत होत राहतं. त्यामुळे हा जीव बायोलॉजिकली कधीच मरत नाही. 2 / 9या जीवाचं नाव आहे टूरूटॉपसिस डॉर्ही. हा जीव एक जेलीफिशची प्रजाती आहे. याला अमर जेलीफिशही म्हटलं जातं. यांचा आकार फार छोटा असतो. हे जेव्हा पूर्णपणे विकसित होता. तेव्हा त्यांचा व्यास ४.५ मिलिमीटर होतो. 3 / 9या जीवाला ८ टेंटिकल्स म्हणजे सोंडी असतात. तर सेक्शुअली मच्युअर झालेल्या जेलीफिशला ८० ते ९० टेंटिकल्स असतात. हे जीव सामान्यपणे समुद्राच्या तळाशी राहतात. यांचे दोन प्रकार असतात. या जेलीफिशच्या अनेक प्रजाती आहेत. 4 / 9ही जेलीफिश मांसाहारी असते. ती जूप्लॅंकटॉन्स खाते. त्यासोबतच माशांची अंडी आणि छोटे मोलस्क खाते. ते आपल्या सोंडेने शिकार करतात. तसेच पोहण्यासाठीही त्याचा वापर करतात. टूरिटॉपसिस डॉर्हीपासून कुणालाही धोका नसतो. यांना इतर मासे खातात. 5 / 9त्यांच्याबाबत फार काही कुणाला समजलं नाही कारण त्यांचा आकार फार लहान असतो आणि पारदर्शी असतो. स्मिथसोनियन ट्रॉपिकल मरीन इन्स्टिट्यूटचे वैज्ञानिक डॉ. मारिया मिगिलेटा म्हणाले की, याने गपचूप जगभरात आपलं साम्राज्य पसरवलं.6 / 9हा जीव स्वत:ला नव्या रूपा बदलतो आणि त्यामुळे याच्या वयाची माहिती मिळत नाही. पण त्यांची लाइफ सायकल छोटीच असते. जर समुद्राचं तापमान २० ते २२ डिग्री असेल तर हे २५ ते ३० दिवसात वयस्क होऊन पुन्हा पिल्लं बनतात. 7 / 9जास्तीत जास्त जेलीफिशचं वय ठरलेलं असतं. त्या काही तासच जिवंत राहतात किंवा काही महिने. मात्र, टूरिटॉपसिस डॉर्ही एकुलती एक अशी प्रजाती आहे जी अमर आहे. यांच्या शरीरात खासप्रकारच्या कोशिका असतात.8 / 9ही जेलीफिश जेव्हा वयस्क होणार असते तेव्हा तिला १२ टेंटिकल्स असतात. तेव्हाच ती स्वत:ला बदलण्याच्या स्टेजमध्ये जाते. येथून ती स्टोलोंस आणि त्यानंतर पॉलिप बनते. २० ते ४० वयस्क थेट पॉलिप बनतात. ही पूर्ण प्रक्रिया दोन दिवसात होते.9 / 9ही जेलीफिश मांसाहारी असते. ती जूप्लॅंकटॉन्स खाते. त्यासोबतच माशांची अंडी आणि छोटे मोलस्क खाते. ते आपल्या सोंडेने शिकार करतात. तसेच पोहण्यासाठीही त्याचा वापर करतात. टूरिटॉपसिस डॉर्हीपासून कुणालाही धोका नसतो. यांना इतर मासे खातात. आणखी वाचा Subscribe to Notifications