Indian Coins: There is a special secret behind these marks on coins, you know?
Indian Coins: नाण्यांवर असलेल्या या खुणांच्या मागे असतं खास गुपित, तुम्हाला माहिती आहे का? By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 10:23 AM1 / 6नोटा ओळण्यासाठी अनेक लोक बऱ्याच ट्रिक्सचा वापर करतात. मात्र त्याशिवाय भारतीय चलनी नाण्यांबाबत काही अशा गोष्टी आहेत. ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसेल. नाण्यांवर असलेल्या काही खुणा कशा बनवल्या जातात आणि त्यामागे काय गुपित असतं, त्याविषयी आज जाणून घेऊ या...2 / 6नाणी पाडणाऱ्या टांकसाळ ह्या भारत सरकारच्या अधिपत्याखालील असतात. ते सरकारकडून येणारे आदेश आणि बाजारातील मागणीनुसार नाणी तयार करतात. टांकसाळींना मिंट असेही म्हणतात. 3 / 6कुठल्याही नाण्याला पाहिल्यावर समजते की, हे कुठल्या टांकसाळीत तयार करण्यात आले आहे. नाण्याच्या खाली असलेली युनिक शेप टांकसाळीबाबत माहिती देते आणि त्यातून नाण्याला वेगळी ओळख मिळते. 4 / 6डायमंड मार्कवाली नाणी मुंबईच्या टांकसाळीमधील असतात. भारतात मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा या चार ठिकाणी टांकसाळी आहेत. स्टार मार्क असलेली नाणी ही हैदराबाद टांकसाळीतील, गोल मार्क असलेली नाणी नोएडा टांकसाळीमधील तर कुठलीही खुणा नसलेली नाणी ही कोलकातामधील असतात.5 / 6जर कुणीही चलनातील नाणी घेण्यास नकार देत असेल तर त्याच्याविरोधात तुम्ही गुन्हा दाखल करू शकता. अशा प्रकरणाची तक्रार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडेही करता येते. 6 / 6रॉयल कॅनडा मिंटच्या नाण्यांवर C आणि रॉयल लंडन मिंटच्या नाण्यांवर छोटासा टिंब दिसतो. त्याशिवाय द मॉस्को मिंटच्या नाण्यावर MMD आणि मेक्सिको सिटी मिंटच्या नाण्यांवर M आणि O चे चिन्ह दिसते. आणखी वाचा Subscribe to Notifications