शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...म्हणून भारतातल्या 'या' ठिकाणी प्रत्येकाच्या शरीरावर गोंदवतात रामाचं नाव; जाणून घ्या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 5:32 PM

1 / 8
भारतात पूर्वीपासूनच अनेक प्रथा, परंपरा मानल्या जातात. धर्मासाठी आणि परंपरा जपण्यासाठी काहीही करण्याची लोकांची तयारी असते. भारताच्या काही गावात अशा प्रथा सुरूवातीपासून आहेत.ज्यांच्याबद्दल फारसं कोणाला काही माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गावातल्या पद्धतीबद्दल सांगणार आहोत.
2 / 8
छत्तीसगडमधील एक दलित रामनामी समाज गेल्या १०० वर्षांपासून या परंपरेचं पालन करत आहे. या समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर राम नामाचे गोंदण आहे. पुरूषंच नाही तर महिलांच्या शरीरावरही अशा प्रकारचे गोंदण दिसून येत आहे.
3 / 8
छत्तीसगडमधील हा समाज आपल्या अनोख्या परंपरेमुळे संपूर्ण जगभरात ओळखला जातो. रामनामी समाजाचे एकूण १ लाख लोक सध्याच्या स्थितीत आहेत. चार जिल्ह्यांमध्ये या समाजातील लोकांचे वास्तव्य आहे. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत अनेकांनी राम नाम गोंदलेले आहे.
4 / 8
असं मानलं जातं की, शरीरावर गोंदवण्याच्या या प्रथेमागे खूप मोठा इतिहास आहे. समाजातील वयस्कर लोकांनी दिलेल्या माहितीनुसार १०० वर्षांपूर्वी उच्च जातीच्या लोकांकडून या समाजातील लोकांना मंदिरात जाण्यापासून रोखलं जात होतं.
5 / 8
याच गोष्टीचा विरोध करण्यासाठी संपूर्ण गावातील लोकांनी अंगावर राम नाम गोंदवून घेतले.
6 / 8
या समाजाचे अनेक लोक पूजा-पाठ करत नाही. तसंच मंदिरातही जात नाहीत असंही म्हटलं जातं. बदलत्या काळानुसार या समाजातील लोकांच्या शरीरावर टॅटू सुद्धा कमी प्रमाणात दिसून येतात. कारण या गावातील काही लोक इतर शहरांमध्ये राहत असल्यामुळे संपूर्ण शरीरावर गोंदवून घेत नाहीत.
7 / 8
या समाजाच्या लोकांच्या घरांवर आणि कपड्यांवर सुद्धा राम ही अक्षरं दिसून येतात. याशिवाय रामनामाचा जप करतात. कपाळावर रामनाम लिहिलेल्या माणसाला शिरोमणी म्हणतात.
8 / 8
संपूर्ण डोक्यावर राम लिहिलेले असल्यास सर्वांग रामनामी म्हणतात. अखंड शरीरावर रामनाम लिहिलेले असेल त्यांना नखशीख रामनामी म्हणतात.
टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडJara hatkeजरा हटके