शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हे भगवान...म्हणे, स्वीमिंग पूलच्या पाण्यातील स्पर्ममुळेही होऊ शकते प्रेग्नंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 3:15 PM

1 / 10
गेल्या काही वर्षांपासून देशात कितीतरी राजकीय नेते विचित्र आणि हास्यास्पद स्टेटमेंट्स करून आपल्या बौद्धिक क्षमतेचं प्रदर्शन घडवत असतात. काही म्हणाले होते की, गोमूत्राने कॅन्सर बरा होता तर कुणी म्हणाले होते की, माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते. मजेदार बाब ही आहे की, अशाप्रकारचे हास्यास्पद वक्तव्ये केवळ भारतातच नाही तर परदेशातही होत असतात. इंडोनेशियातील एका महिला अधिकाऱ्याने असंच एक चक्रावून सोडणारं वक्तव्य केलंय. (Image Credit : abc.net.au)
2 / 10
इंडोनेशियातील हेल्थ विभागाच्या एक महिला अधिकारी म्हणाली की, जर स्वीमिंग पूलमध्ये एखादा स्ट्रॉंग स्पर्म असलेला पुरूष असेल तर त्या स्वीमिंग पूलमध्ये जाऊन महिला गर्भवती होऊ शकतात. Sitti Hikmawatty असं महिलेचं नाव आहे. (Image Credit : lakeshorepoolsandtubs.com)
3 / 10
ती म्हणाली की, जर काही कारणाने स्टॉंग स्पर्म असलेल्या पुरूषाने स्वीमिंग पूलमध्ये स्पर्म इजॅक्यूलेट केले तर आणि त्याच पूलमध्ये महिला जातील तर त्या गर्भवती होऊ शकतात. म्हणजे पुरूष आणि महिलेचा थेट संबंध न येताही महिला गर्भवती होऊ शकतात असा त्यांनी दावा केलाय. (Image Credit : indonesiaexpat.biz)
4 / 10
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार ही महिला अधिकारी म्हणाली की, 'जर महिला सेक्शुअली अ‍ॅक्टिव असतील तर त्या गर्भवती होऊ शकतात. हे कुणालाच माहीत नाही की, महिला स्वीमिंग पूलमध्ये असताना पुरूष तेव्हा कशाप्रकारे रिअॅक्ट करतील'. (Image Credit : commons.wikimedia.org)
5 / 10
या महिला अधिकाऱ्याने हे सगळे दावे Tribun Jakarta ला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. आता त्यावरून सोशल मीडियातून लोक तिच्यावर टीका करत आहेत. टीका अधिकच होत असल्याचे पाहून नंतर तिने तिचं वक्तव्य मागे घेतलं आणि माफी मागितली.
6 / 10
ती म्हणाली होती की, 'काही स्ट्रॉंग टाइपचे स्पर्म हे महिलांना स्वीमिंग पूलमध्ये गर्भवती करू शकतात. थेट शरीराशी संबंध न येताही पुरूष उत्तेजित होऊ शकतात आणि इजॅक्यूलेट करू शकतात. यानेच महिला गर्भवती राहण्याचा धोका असतो'. (Image Credit : mh.co.za)
7 / 10
महिलेच्या या वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यातील एक इंडोनेशियातील ब्लॉगर डॉक्टर म्हणाला की, 'पुन्हा एकदा सांगतो. जर तुम्हाला हेल्थसंबंधी समस्या समजत नसतील तर गप्प बसा. तुमच्या चुकीच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण होते'. (Image Credit : unsplash.com)
8 / 10
'मला हे सांगायचं आहे की, महिला आणि पुरूष एकत्र एका स्वीमिंग पूलमध्ये असतील तर महिला गर्भवती होतात हे शक्य नाही. कारण जे स्वीमिंग करतात त्यातील सगळेच इजॅक्यूलेट करत नाही आणि स्पर्म स्वीमिंग पूलमधील केमिकल मिश्रित पाण्यात जिवंत राहू शकत नाहीत'.
9 / 10
इंडोनेशियातील डॉक्टर असोसिएशनचे मुख्य डॉक्टर नजर यांनी Jakarta Post ला सांगितले की, 'स्वीमिंग पूलच्या पाण्यात क्लोराइन आणि इतरही काही केमिकल्स असतात. स्पर्म या केमिकलमध्ये जिवंतच राहत नाहीत'. (Image Credit : openpr.com)
10 / 10
हा वाद खूप वाढल्यावर महिला अधिकाऱ्याने चुकीची माहिती लोकांमध्ये दिल्याबद्दल माफी मागितली. ते माझं वैयक्तिक विधान होतं. माझे शब्द मी परत घेते.
टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाPregnancyप्रेग्नंसी