Inside pics of most expensive 190 crore flat in Gurgaon
पेंटहाऊस आतून कसं दिसतं? बघा १९० कोटी रूपयांना विकलेल्या गेलेल्या फ्लॅटचे फोटो! By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2024 2:45 PM1 / 7Gurugram Rs 190 crore Flat: गुरूग्राममधील एका फ्लॅटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण या फ्लॅटची किंमत तब्बल १९० कोटी रूपये इतकी आहे. सामान्यपणे १ ते दीड कोटी रूपये किंमतीचे फ्लॅट लोकांना माहीत असतात. मात्र, हा फ्लॅट १९० कोटी रूपयांना विकला गेलाय. 2 / 7हरयाणाच्या गुडगावमध्ये या फ्लॅट किंवा अपार्टमेंटची विक्री झाली. डीएलएफचे 'द कॅमोलियाज' प्रोजेक्टमध्ये हा फ्लॅट विकला गेला. १६, २९० वर्ग फुटाच्या या फ्लॅट किंमतीच्या बाबतीत एक बेंचमार्क तयार केला आहे.3 / 7हा फ्लॅट खरेदी करणाऱ्या व्यक्तीने रजिस्ट्रीसाठी १३ कोटी रूपये दिले. या फ्लॅटची खरेदी गेल्याच आठवड्यात झाली. हा फ्लॅट देशातील सगळ्यात महागड्या अपार्टमेंटपैकी एक झाला आहे.4 / 7190 कोटी रूपयांचा हा फ्लॅट इन्फो-एक्स सॉफ्टवेयर टेक्नोलॉजी प्रायवेट लिमिटेडचे निर्देशक ऋषी पारती यांनी खरेदी केलाय. ते वेगवेगळ्या कंपन्यांचे मालकही आहेत.5 / 7पेंटहाऊस अर्थ होतो असा फ्लॅट किंवा अपार्टमेंट जो एका मोठ्या इमारतीच्या टॉपवर बनवला जातो. पेंटहाऊसमध्ये इमारतीच्या टेरेसवर मोठमोठ्या रूमचे आरामदायक फ्लॅट्स असतात. 6 / 7ही अपार्टमेंट बिल्डींगच्या सगळ्यात टॉप फ्लोरवर असतो. पूर्ण बिल्डींगमध्ये केवळ एकच पेंटहाऊस बनवू शकतात. ज्यामुळे त्याची किंमतही अधिक असते.7 / 7पेंटहाऊसमध्ये लक्झरी इनडोरसोबतच अनेक आधुनिक सोयी सुविधाही असतात. यात स्वीमिंग पूल, आलिशान बाथरूम, गार्डनचाही समावेश असतो. आणखी वाचा Subscribe to Notifications