लाल, गुलाबी ओठांबाबतच्या या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला नक्कीच माहीत नसणार, वाचाल तर हैराण व्हाल.. By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2022 12:22 PM
1 / 7 ओठ हे शरीरातील सर्वात सुंदर अंगापैकी एक आहे. ओठांमुळे एखाद्याच्या सुंदरतेत भर पडते तर दुसरीकडे यामुळे अनेकांचं व्यक्तीत्व माहीत होतं. हे सर्वांना माहीत आहे की, ओठांचा वापर बोलण्यासाठी, खाण्यासाठी केला जातो. पण ओठांबाबत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहितही नसतील आणि तुम्ही कधी या गोष्टींचा विचारही केला नसेल. तुम्ही कधीही विचार नसेल केला की, ओठांचा रंग लाल- गुलाबी का असतो? किंवा काहींचे ओठ हे जाड आणि काहींचे बारीक का असतात? चला जाणून घेऊया ओठांबाबत अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी.... 2 / 7 1) ओठांना यामुळे येत नाही घाम - आपल्या शरीरावर सगळीकडेच घाम आलेला तुम्ही अनुभवला असेल. पण कधी ओठांवर घाम आलेला पाहिला का? नाही ना? तर यालाही एक कारण आहे. ओठांमध्ये घामाच्या ग्रंथी (sweat gland) नसतात. शरीराच्या इतर भागांपेक्षा ओठ अधिक कोरडे असण्याचं हे एक मुख्य कारण आहे. 3 / 7 2) वय वाढल्यावर ओठांमध्ये होतो बदल - तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, वय वाढण्यासोबत ओठांमध्येही बदल होतो. ओठ अधिक बारीक किंवा लहान होतात. याचं कारण म्हणजे वाढत्या वयासोबत शरीरात कोलेजन तयार होणं कमी होतं. कोलेजन हे एक प्रोटीन आहे जे टिश्यू निर्माण करण्यासाठी गरजेचं असतं. 4 / 7 3) ओठांचा रंग लाल किंवा गुलाबी का असतो? - हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाही नसेल पण जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच असेल. मुळात मानवाच्या शरीरावर मासांचे वेगवेगळे 16 थर असतात. तर ओठांवर केवळ पाच थर असतात. त्यामुळेच ओठ अधिक नाजूक आणि लाल-गुलाबी रंगांचे असतात. 5 / 7 5) ओठांनाही मारतो लखवा - तुम्ही पाहिलं असेल की, काही लोकांचे ओठ वाकडे-तिकडे असतात, असे लखवा मारल्यानेही होऊ शकते. याचा अर्थ असा होतो की, ओठांनाही लखवा मारला जातो. 6 / 7 6) ओठांनी कशी वाजते शिटी - काय तुम्हाला माहीत आहे की, ओठांनी शिटी का वाजते? ओठांमध्ये ऑर्बिकुलरिस ओरिस (Orbicularis oris) मसल्स असतात. याचा उपयोग ब्रास आणि वुडवाईंड इन्स्ट्रूमेंट वाजवण्यासाठी होतो. जेव्हा हे इन्स्ट्रूमेंट ओठांवर ठेवले जातात तेव्हा ते मसल्स तोंडाला बंद करतात आणि ओठ आकुंचन पावतात. 7 / 7 6) ओठांनी कशी वाजते शिटी - काय तुम्हाला माहीत आहे की, ओठांनी शिटी का वाजते? ओठांमध्ये ऑर्बिकुलरिस ओरिस (Orbicularis oris) मसल्स असतात. याचा उपयोग ब्रास आणि वुडवाईंड इन्स्ट्रूमेंट वाजवण्यासाठी होतो. जेव्हा हे इन्स्ट्रूमेंट ओठांवर ठेवले जातात तेव्हा ते मसल्स तोंडाला बंद करतात आणि ओठ आकुंचन पावतात. आणखी वाचा