शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतातील एक असा रहस्यमय किल्ला, जेथून अचानक गायब झाली होती संपूर्ण वरात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 4:18 PM

1 / 8
भारत हा मंदिरांचा देश असण्यासोबतच किल्ल्यांचाही देश आहे. कारण आपल्या देशात शेकडो किल्ले आहेत, जे देशातील वेगवेगळ्या भागात आहेत. यातील अनेक किल्ले हे शेकडो वर्ष जुने आहेत. ज्यांच्या निर्माणाबाबत काहीच माहिती नाही. प्राचीन किल्ले नेहमीच रहस्य आणि जिज्ञासेचे विषय राहिले आहेत. अशाच एका किल्ल्याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 8
आम्ही तुम्हाला सांगतोय गढकुंडार किल्ल्याबाबत जो उत्तर प्रदेशच्या झांसीपासून साधारण ७० किलोमीटर दूर आहे. ११व्या शतकात तयार केलेला हा किल्ला पाच मजली आहे. ज्याचे तीन मजले तर वर दिसतात, पण दोन मजले जमिनीच्या खाली आहे.
3 / 8
हा किल्ला कधी आणि कुणी बनवला याबाबत ठोस काही पुरावे नाहीत. पण सांगितलं जात आहे की, हा किल्ला १५०० ते २००० वर्ष जुना आहे. इथे चंदेल, बुंदेल आणि खंगार सारख्या शासकांनी राज्य केलं.
4 / 8
गडकुंडार किल्ला सुरक्षेच्या दृष्टीने बनवण्यात आलेला खास किल्ला आहे. हा किल्ला लोकांना भ्रमित करतो. किल्ला बनावट अशी आहे की, हा चार ते पाच किलोमीटर अंतराहून दिसतो. पण जवळ येताच किल्ला दिसणं बंद होतं. ज्या रस्त्याने किल्ला दूरून दिसतो. जर त्या रस्त्यावर तुम्ही गेलात तर तो रस्ता किल्ल्याऐवजी दुसऱ्याच ठिकाणी जातो. तर किल्ल्यासाठी दुसरा रस्ता आहे.
5 / 8
गढकुंडार किल्ल्याची नाव भारतातील सर्वात रहस्यमय किल्ल्यांमध्ये घेतलं जातं. आजूबाजूचे लोक सांगतात की, बऱ्याच वर्षाआधी येथील जवळच्या गावात एक वरात आली होती. वरात किल्ल्यावर फिरायला गेले.
6 / 8
फिरता-फिरता ते तळघरात गेले. ज्यानंतर ते रहस्यमयरित्या अचानक गायब झाले. त्या ५० ते ६० लोकांचा पत्ता आजपर्यंत लागला नाही. त्यानंतरही अशा काही घटना घडल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर किल्ल्यात खाली जाणारे सर्व दरवाजे बंद करण्यात आले.
7 / 8
हा किल्ला एखाद्या भुलभुलैयापेक्षा कमी नाही. जर माहिती नसेल तर यात अधिक आत गेल्यावर तुम्ही रस्ता हरवू शकता. किल्ल्यात अंधार असल्याने तो भीतीदायकही वाटतो.
8 / 8
असे म्हणतात की, या किल्ल्यात एका खजिन्याचं रहस्य लपलं आहे. ते शोधण्याच्या नादात अनेक लोकांचा जीव गेला. इतिहासातील जाणकार सांगतात की, येथील राजांजवळ सोने-हिरे, दागिन्यांची काहीच कमतरता नव्हती. येथील खजिना शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण त्यांच्या हाती काही लागलं नाही.
टॅग्स :FortगडUttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स