interesting-history-of-tea-in-the-world
५००० हजार वर्षांआधी चीनी सम्राटासोबत झालेल्या चुकीमुळे झाला होता चहाचा जन्म, कसा ते वाचा! By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 3:57 PM1 / 10चहा हे एक असं पेय आहे जे गरीब-श्रीमंत मोठ्या आवडीने पितात. चहा इतिहास फार जुना आहे. देशातील सर्व राज्यांपैकी केवळ १५ राज्यांमध्ये चहाचं उत्पादन घेता येतं. चहाने अनेक फ्लेव्हर असतात. ग्रीन टी, ब्लॅक टी आणि सोबतच व्हाइट टी सुद्धा लोक पितात. चहाचा इतिहास हा ५ हजार वर्ष जुना आहे. चीनमध्ये एक सम्राट होते शेन नुग्न. त्यांना रोज फिरून झाल्यावर बागेत बसून गरम पाणी पिण्याची सवय होती. एक दिवस त्यांच्या पाण्यात काही पाने पडली. त्यांच्या नोकरांनी पाणी फेकण्याचा प्रयत्न केला. पण सम्राटांनी अडवलं. त्यांना पाण्याचा चांगला सुगंध येत होता. कुणाचंही न ऐकता त्यांनी ते पाणी प्यायलं. त्यांना टेस्ट चांगली वाटली. पाण्यात पडलेली ती पाने चहाची होती. ही होती चहाबाबत सांगितली जाणारी कथा....आता काही फॅक्ट्स जाणून घेऊ...2 / 10१० जानेवारी १८३५ मध्ये भारतातून चहाची पहिली खेप इंग्लंडला पोहोचली होती. यानंतर चीनने इंग्रजांसोबत व्यापारी करार केला आणि त्यांना चहाच्या बीया दिल्या. भारताबाबत सांगायचं तर इथे ५० प्रकारच्या चहाचं उत्पादन घेतलं जातं. हिमाचल प्रदेश, दार्जिंलिंग आणि तामिळनाडूमधील चहा जगभरात पसंत केला जातो.3 / 10देशातील ज्या राज्यांमध्ये चहाचं उत्पादन होतं त्यात आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, हिमाचल प्रदेश कर्नाटक, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, सिक्कीम, मणिपूर, मिझोराम, मेघालय आणि नागालॅंड यांचा समावेश आहे.4 / 10चहाला त्याच्या प्रोसेसिंच्या आधारावर ग्रीन टी, ओलोंग टी, ब्लॅक टी आणि व्हाइट टी असं विभागलं जातं. २१ मे ला संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय चहा दिवस घोषित केला.5 / 10भारतीय चहा निर्यात संघाच्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये जवळपास २५.२ कोटी किलोग्रॅम चहा निर्यात केला गेला. केनिया आणि आफ्रिकेतील चहाची किंमत भारतातील चहाच्या तुलनेत कमी असल्याने जगात त्यांची डिमांड वाढत आहे. 6 / 10असं सांगितलं जातं की, भारतात चहाचा शोध सर्वातआधी १८१५ मध्ये लागला. काही इंग्रज प्रवाशांची नजर चहाच्या झाडांवर पडली होती. हे स्थानिक लोक पाण्यात उकडून पित होते.7 / 10भारताचे गवर्नर लॉर्ड बॅंटिक यांनी १८३४ मध्ये चहाची परंपरा सुरू करणे आणि उत्पादनाची शक्यता शोधणे यासाठी एक समिती नेमली होती. त्यानंतर १८३५ मध्ये चहाच्या बागा लावण्यात आल्या.8 / 10१८४१ पासून दार्जिलिंगमध्ये चीनी चहाची झाडे लावली जातात. इथून चहा आंतरराष्ट्रीय बाजारात सप्लाय होतो. या चहासाठी येथीलच मातीचा वापर होतो. हा चहा दुसऱ्या ठिकाणी उगवत नाही. 9 / 10अनेकांना ब्लॅक टी, ग्रीन टी आणि दुधाचा चहा हे माहीत आहे. पण कधी तुम्ही पांढरा चहा घेतला का? यात कळ्या पूर्णपणे उमलण्याआधी म्हणजे केस पांढरे होण्याआधी त्याची पाने तोडली जातात. हा चहा कडक नसतो. यात कॅफीन कमी आणि अॅंटी ऑक्सीडेंट गुण अधिक असतात.10 / 10भारतात साधारण ६५ टक्के लोक चहा पितात. हे प्रमाण दरवर्षी ३ टक्क्यांनी वाढतं. महत्वाची बाब म्हणजे चहा दिवसेंदिवस महाग होत आहे. पण त्यावर कुणी चर्चा करत नाही. हे तर तुम्हाला माहीत असेलच की, भारतात चहा चीनमधून पोहोचला. आणखी वाचा Subscribe to Notifications