interesting love story of an Indian spy Ravinder Kaushik aka The Black Tiger
भारताच्या 'या' गुप्तहेराची लव्हस्टोरी वाचून व्हाल अवाक्, पाक आर्मीत मिळवलं होतं मेजर पद By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 3:16 PM1 / 7आलिया भट्टचा 'राझी' पाहिल्यावर समजलं होतं की, एका गुप्तहेराचं आयुष्य कित खतरनाक असतं. तरी सुद्धा देशातील अनेक तरूणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं काम पूर्ण केलं. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एका भारतीय गुप्तहेराची कहाणी. त्याचं नाव आहे रविंद्र कौशिक. रविंद्र कौशिक आपली खरी ओळख लपवत पाकिस्तानी आर्मीत मेजर बनले होते. 2 / 7रविंद्र यांचा जन्म राजस्थानच्या श्रीगंगापूरमध्ये झाला होता. त्यांचा जन्म ११ एप्रिल १९५२ ला झाला होता. त्यांना थिएटर करण्याची फार आवड होती. एका थिएटरमध्ये त्यांचं काम पाहून त्यांना रॉ ने स्पॉट केलं होतं. रविंद्र यांनी १९७५ मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. केवळ २३ वर्षाचे असताना त्यांनी रॉ जॉइन केलं होती. त्यांचं नवं नाव होतं नबी अहमद शाकिर. त्यांचे सगळे रेकॉर्ड्स डिलिट करून त्यांना पाकिस्तानात एका मिशनवर पाठवण्यात आलं होतं.3 / 7रॉ कडून त्यांना अंडरकव्हर एंजट बनण्यासाठी पूर्णपणे तयार करण्यात आलं होतं. मिशनवर जाण्याआधी त्यांना २ वर्षे कठोर ट्रेनिंग देण्यात आलं होतं. त्यांना उर्दू शिकवण्यात आली आणि मुस्लिम धर्मासंबंधी महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या.4 / 7त्यानंतर पाकिस्तानात जाऊन त्यांनी कराची विश्वविद्यालयात प्रवेश घेतला. इथूनच त्यांनी एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर पाकिस्तानही आर्मी जॉइन केली.5 / 7यादरम्यान ते पाकिस्तान आर्मीतील एका अधिकाऱ्याच्या मुलीच्या प्रेमात पडले. तिचं नाव होतं अमानत. आधी ते दोघे मित्र होते. नंतर दोघांनी लग्न केलं. त्यांनी पत्नी अमानतला कधीही हे समजू दिलं नाही ते रॉ साठी काम करतात. दोघांना एक मुलगा झाला आणि त्याचं नाव त्यांनी आरीब अहमद खान ठेवलं.6 / 7१९७९ ते १९८३ दरम्यान त्यांनी बरीच महत्वाची माहिती भारतीय सेनेला पाठवली. त्यांच्या बहादुरीमध्ये त्यांचं नाव टायगर पडलं होतं. सगळेच त्यांना द ब्लॅक टायगर म्हणायचे. सप्टेंबर १९८३ मध्ये भारताने एका सामान्य गुप्तहेरास रविंद्र कौशिकला संपर्क करण्यास सांगितला. पाक सेनेने त्याला पकडलं. त्यानंतर त्याने सगळं सत्य उलगडलं. त्यानंतर कौशिक पकडले गेले.7 / 7१९८५ मध्ये पाकिस्तानी कोर्टाने कौशिक यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. नंतर ही शिक्षा कोर्टाने जन्मठेपेच्या शिक्षेत बदलली. ते पाकच्या सियालकोट येथील कोट लखपत आणि मियांवाली तुरूंगात साधारण १६ वर्ष कैद होते. तुरूंगात राहिल्याने त्यांना टीबी, अस्थमा आणि हृदयरोग झाले होते. नोव्हेंबर २००१ मध्ये त्यांचं निधन झालं. मृत्यूनंतर त्यांना मुल्तानच्या सेंट्रल जेलमध्ये दफन करण्यात आलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications